Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याप्रमाणेच त्यांनी पवित्र लेखात सांगितल्याप्रमाणे मांडवांचा सण पाळला आणि दररोज प्रयोजन पडेल तेवढे रोजचे होमबली नियमानुसार अर्पण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग त्यांनी मंडपाचा सण शास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळला आणि प्रत्येक दिवसाची होमार्पणे त्याच्या विधीप्रमाणे जशी नेमलेली होती तशी रोज अर्पण केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी मंडपांचा सण पाळला व सणाच्या नियमानुसार प्रतिदिवसासाठी नेमलेले होमबली प्रत्येक दिवशी अर्पिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 3:4
14 Iomraidhean Croise  

कोशापुढे दररोज गरज पडेल त्याप्रमाणे सतत सेवा करावी म्हणून दाविदाने आसाफ व त्याचे भाऊबंद ह्यांना परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर राहण्यासाठी नेमले;


तसेच पुरुषांच्या वंशावळीत नोंदलेले जे पुरुष तीन वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून प्रत्येक दिवसाच्या कामासाठी परमेश्वराच्या मंदिरात जात असत, त्यांच्या-त्यांच्या क्रमानुसार जी त्यांची सेवा असे तिच्याप्रमाणे त्यांना वाटणी देत असत.


शेतात पेरलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ, आणि वर्षअखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ.


वेदीवर होम करायचा तो असा : प्रतिदिनी एकेक वर्षाच्या दोन कोकरांचा नित्य होम करावा.


त्यांच्यामागे मुकादमांचा असा तगादा असे की, “तुम्हांला गवत पुरवण्यात येत होते तेव्हाच्या इतके तुमचे रोजचे काम पुरे करा.”


त्याच्या निर्वाहाकरता त्याला बाबेलच्या राजाने कायमची नेमणूक करून दिली, ती त्याला आमरण नित्य मिळत होती.


परमेश्वर मोशेला म्हणाला,


तुमचे नवस व स्वखुशीची अर्पणे ह्यांखेरीज नेमलेल्या सणात हे होमबली, अन्नार्पणे, पेयार्पणे आणि शांत्यर्पणे परमेश्वराला अर्पावीत.”


यहूद्यांचा सण म्हणजे मंडपांचा सण जवळ आला होता.


मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan