Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा येशूवा बिन योसादाक व त्याचे बांधव जे याजक आणि जरूब्बाबेल बिन शल्तीएल व त्याचे बांधव ह्यांनी उभे राहून देवाचा माणूस मोशे ह्याच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे होमार्पणे करण्यासाठी इस्राएलाच्या देवाची वेदी बांधली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 योसादाकाचा मुलगा येशूवा आणि त्याचे भाऊ याजक व शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि त्याचे भाऊ यांनी उठून इस्राएलाच्या देवाला होमार्पणे अर्पिण्यासाठी, देवाचा मनुष्य मोशे याच्या नियमशास्त्रात आज्ञापिल्याप्रमाणे वेदी बांधली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 नंतर योसादाकाचा पुत्र येशूआने आपल्या बरोबरीच्या याजकांना आणि शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व त्याच्या बंधूना बरोबर घेऊन इस्राएलांच्या परमेश्वराची वेदी पुन्हा बांधली आणि परमेश्वराचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे वेदीवर होमार्पणे वाहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 3:2
33 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार.” परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली.


देवाचा माणूस मोशे ह्याचे पुत्र लेवी वंशात मोडत.


बंदिवान यखन्या ह्याचा पुत्र शलतीएल;


पदायाचे पुत्र : जरूब्बाबेल व शिमी; जरूब्बाबेलचे पुत्र : मशुल्लाम व हनन्या; त्यांची बहीण शलोमीथ;


परंतु यरुशलेम येथे माझे नाव असावे म्हणून मी ते निवडले आहे. माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर मी दाविदाला निवडून नेमले आहे.’


याजक वंशातील ज्या पुरुषांनी अन्य जातींच्या स्त्रिया केल्या होत्या ते हे : येशूवा बिन योसादाक ह्याच्या वंशातील व त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मासेया, अलियेजर, यारीब व गदल्या.


इम्मेराच्या वंशातले : हनानी व जबद्या;


आणि हारीमाच्या वंशातले मासेया, एलीया, शमाया, यहीएल व उज्जीया;


पशहूराच्या वंशातले एल्योवेनय, मासेया, इश्माएल, नथनेल, योजाबाद व एलासा;


जरूब्बाबेलबरोबर आले ते येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम, बाना. इस्राएल लोकांतल्या मनुष्यांची ही मोजदाद आहे :


यरुशलेमेतील देवाच्या मंदिराप्रत आल्यावर दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्यात जरूब्बाबेल बिन शल्तीएल, येशूवा बिन योसादाक व त्यांचे इतर बांधव जे याजक व लेवी होते त्यांनी आणि जे बंदिवासातून यरुशलेमेस आले होते त्या सर्वांनी कामास आरंभ केला; वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जे लेवी होते त्यांना परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले.


जरूब्बाबेल बिन शल्तीएल आणि येशूवा बिन योसादाक हे तयार होऊन यरुशलेमेतील देवाचे मंदिर बांधू लागले; देवाचे संदेष्टे त्यांना साहाय्य करीत असत.


शल्तीएलाचा पुत्र जरूब्बाबेल व येशूवा ह्यांच्याबरोबर जे याजक व लेवी वर आले ते हे : सराया, यिर्मया, एज्रा,


लेवी : येशूवा, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, मत्तन्या व त्याचे भाऊबंद स्तुतिगायनाच्या कामावर होते;


तर यहूदाचा वंश त्याने पसंत केला; आपणाला प्रिय जो सीयोन डोंगर तो त्याने पसंत केला.


बाभळीच्या लाकडाची पाच हात लांब व पाच हात रुंद अशी एक वेदी बनव; ती चौरस असावी. तिची उंची तीन हात असावी.


दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी, सहाव्या महिन्याच्या प्रतिपदेस यहूदाचा प्रांताधिकारी शल्तीएल ह्याचा पुत्र जरूब्बाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा ह्यांना हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :


तेव्हा शल्तीएलाचा पुत्र जरूब्बाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा ह्यांनी सर्व अवशिष्ट लोकांसह आपला देव परमेश्वर ह्याच्या वाणीस मान दिला, आपला देव परमेश्वर ह्याने पाठवलेल्या हाग्गय संदेष्ट्याची वचने मानली आणि ते लोक परमेश्वराचे भय धरू लागले.


यहूदाचा प्रांताधिकारी शल्तीएल ह्याचा पुत्र जरूब्बाबेल, मुख्य याजक यहोसादाक ह्याचा पुत्र यहोशवा व सर्व अवशिष्ट लोक ह्यांच्या आत्म्यांना परमेश्वराने स्फूर्ती दिली; तेव्हा ते जाऊन आपला देव सेनाधीश परमेश्वर ह्याचे मंदिर बांधण्याच्या कामास लागले;


“यहूदाचा प्रांताधिकारी जरूब्बाबेल ह्याला सांग : मी आकाश व पृथ्वी ही हलवून सोडीन;


सेनाधीश परमेश्वर म्हणतो : त्या दिवशी, हे जरूब्बाबेला, शल्तीएलाच्या पुत्रा, माझ्या सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण मी तुला निवडले आहे,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे, असे त्याने मला दाखवले.


आता हे मुख्य याजका, यहोशवा, तू व तुझ्याबरोबर बसणारे तुझे सोबती, तुम्ही ऐका; ती माणसे चिन्हादाखल आहेत; पाहा, मी माझा सेवक जो ‘कोंब’ त्याला आणतो.


सोनेरुपे घेऊन मुकुट घडव व तो यहोसादाकाचा पुत्र यहोशवा मुख्य याजक ह्याच्या मस्तकी घाल.


“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, माझे अर्पण म्हणजे माझे सुवासिक हव्यान्न तुम्ही माझ्याप्रीत्यर्थ नियमित समयी अर्पण करण्यास जपा.


तो योहानानाचा, तो रेशाचा, तो जरूब्बाबेलाचा, तो शल्तीएलाचा, तो नेरीचा,


मग गिदोनाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली व तिचे नाव याव्हे-शालोम (शांतिदाता परमेश्वर) असे ठेवले; अबियेजर्‍यांच्या अक्रा येथे ती आजपर्यंत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan