Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 3:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 जयघोषाचा नाद व लोकांच्या रडण्याचा नाद ह्यांतील भेद लोकांना कळेना, कारण लोक उच्च स्वराने जयजयकार करत होते व त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 हा आवाज बऱ्याच दूरपर्यंत ऐकू जात होता. एकंदर आवाज एवढा मोठा होता की, त्यातला रडण्याचा आवाज कोणता व आनंदाचा आवाज कोणता हे ओळखू येत नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 लोक इतक्या मोठ्याने जयघोष करीत होते की त्यांचा आवाज दूर अंतरावरूनही ऐकू येत होता आणि त्यामुळे रडण्याचा आवाज व आनंदाचा आवाज यातील फरक लोकांना समजत नव्हता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 3:13
14 Iomraidhean Croise  

मग सर्व लोक त्याच्यामागे चालले; ते वाजंत्री वाजवत होते व आनंदाचा गजर करत होते, त्या नादाने पृथ्वी दणाणली.


आणि सादोक याजक व नाथान संदेष्टा ह्यांनी त्याला गीहोन येथे राज्याभिषेक केला व ते तेथून एवढा जयघोष करीत वर गेले की नगर अगदी दणाणून गेले; तुमच्या कानी ध्वनी पडला तो हाच.


तेव्हा बरेच याजक, लेवी आणि पितृकुळांचे प्रमुख अशा ज्या वृद्ध लोकांनी पूर्वीचे मंदिर पाहिले होते त्यांनी आपल्या डोळ्यांनी ह्या मंदिराचा पाया घातलेला पाहिला तेव्हा त्यांना रडू कोसळले व त्यांच्यातले पुष्कळ जण हर्षभराने जयघोष करू लागले.


बंदिवासातून आलेले लोक इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ मंदिर बांधत आहेत असे यहूदा व बन्यामीन ह्यांच्या शत्रूंनी ऐकले,


त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण त्यांनी आनंदीआनंद करावा असे देवाने केले होते; बायकामुलांनीही आनंद केला; यरुशलेमेचा आनंदध्वनी दूर जाऊन पोहचला.


परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करोत; त्यांचे तू रक्षण करतोस म्हणून ते सदा गजर करोत; ज्यांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठायी उल्लास पावोत.


त्यांत आनंद व हर्ष ह्यांचा ध्वनी होईल, नवर्‍याची व नवरीची वाणी ऐकू येईल; ‘सेनाधीश परमेश्वराची स्तुती असो, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सर्वकाळची आहे,’ असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतात त्यांचा शब्द पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास उलटवून आरंभी होते तसे सर्वकाही करीन, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांत, त्या काळी इस्राएल लोक येतील, ते व यहूदाचे लोक जमून येतील; ते वाटेने रडत येतील, परमेश्वर आपला देव ह्याला शरण येतील.


हे महान पर्वता, तू काय आहेस? जरूब्बाबेलपुढे तू सपाट मैदान होशील; व तो ‘त्यावर अनुग्रह, त्यावर अनुग्रह,’ असा गजर करत कोनशिला पुढे आणील.”


त्यांनी त्या स्थळाचे नाव बोखीम (आक्रोश करणारे) असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वराला यज्ञ केले.


परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला तेव्हा सर्व इस्राएलांनी एवढा जयघोष केला की त्याने भूमी दणाणली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan