Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 बांधकाम करणार्‍यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्राएलाचा राजा दावीद ह्याने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराचे स्तवन करण्यास आपले पोशाख ल्यालेले व हाती कर्णे घेतलेले याजक आणि हाती झांजा घेतलेले आसाफ वंशातले लेवी ह्यांना उभे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 जेव्हा बांधणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्राएलचा राजा दावीद याच्या आज्ञेप्रमाणे याजकांनी आपला याजकीय पोषाख घालून हाती कर्णे घेतले व झांजा वाजवणारे लेवी, आसाफाची मुले परमेश्वराच्या स्तवनासाठी आपापल्या जागी उभे राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 बांधकाम करणार्‍यांनी याहवेहच्या मंदिराच्या पायाचे बांधकाम पूर्ण केले, तेव्हा याजकांनी आपले याजकीय पोशाख घातले व आपल्या तुतार्‍या वाजविल्या. आसाफाच्या वंशातील लेव्यांनी आपल्या झांजा वाजविल्या. इस्राएलच्या दावीद राजाने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे त्यांनी याहवेहची स्तुती केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 3:10
26 Iomraidhean Croise  

शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्‍या, बनाया व अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे कर्णे वाजवीत; ओबेद-अदोम व यहीया हे कोशाचे द्वारपाळ होते.


दावीद, कराराचा कोश वाहणारे सर्व लेवी, गायक व मुख्य गायक कनन्या ह्या सर्वांनी तलम सणाचे झगे परिधान केले होते; दाविदाने तागाचे एफोद घातले होते.


कोशापुढे दररोज गरज पडेल त्याप्रमाणे सतत सेवा करावी म्हणून दाविदाने आसाफ व त्याचे भाऊबंद ह्यांना परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर राहण्यासाठी नेमले;


त्यांच्याबरोबर हेमान व यदूथून कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून देवाप्रीत्यर्थ गायनवादन करीत; यदूथूनाच्या पुत्रांना द्वारपाळ केले.


चार हजार द्वारपाळ होते; आणि परमेश्वराची स्तोत्रे म्हणणार्‍यांसाठी दाविदाने जी वाद्ये केली होती त्यांवर परमेश्वराचे स्तवन करण्यासाठी चार हजार माणसे नेमली.


अठरावी हनानीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;


नंतर त्यांनी स्वत:साठी व याजकांसाठी तयारी केली, कारण अहरोनाचे वंशज जे याजक ते रात्र पडेपर्यंत होमबली व चरबी अर्पण करण्यात गुंतले होते; म्हणून लेव्यांनी स्वत:साठी व अहरोनवंशज ह्यांच्यासाठी तयारी केली.


दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा द्रष्टा यदूथून ह्यांच्या आज्ञेप्रमाणे आसाफ वंशातले गायक आपापल्या ठिकाणी होते, आणि द्वारपाळ प्रत्येक द्वाराजवळ होते; त्यांना आपले काम सोडून जावे लागले नाही, कारण त्यांचे भाऊबंद जे लेवी त्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली.


जितके लेवी गाणारे होते, म्हणजे अर्थात आसाफ, हेमान व यदूथून, तितके सगळे आपल्या पुत्रांसह व भाऊबंदांसह सणाची वस्त्रे लेऊन झांजा, सारंग्या व वीणा घेऊन वेदीच्या पूर्व बाजूस उभे राहिले व त्यांच्याबरोबर एकशे वीस याजक कर्णे वाजवत होते.


गायकांपैकी आसाफाच्या वंशातले एकशे अठ्ठावीस,


मग शेशबस्सराने येऊन यरुशलेमेतल्या देवमंदिराचा पाया घातला; तेव्हापासून आजवर हे बांधण्याचे काम चालू आहे, अद्यापि हे पुरे झाले नाही.’


खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा. झणझणणार्‍या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा.


आजपासून मागची, म्हणजे परमेश्वराच्या मंदिराचा दगडावर दगड रचण्यापूर्वीची, जी स्थिती होती तिच्याकडे लक्ष पुरवा;


तर कार्याच्या अल्पारंभाचा दिवस कोणी तुच्छ मानतो काय? ते सात डोळे जरूब्बाबेलच्या हातातील ओळंबा आनंदाने पाहतील; ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात.”


तेव्हा त्याने मला उत्तर केले, “जरूब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे : बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


हे महान पर्वता, तू काय आहेस? जरूब्बाबेलपुढे तू सपाट मैदान होशील; व तो ‘त्यावर अनुग्रह, त्यावर अनुग्रह,’ असा गजर करत कोनशिला पुढे आणील.”


त्याला सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, एक पुरुष, ज्याचे नाव कोंब असे आहे तो आपल्या स्थानी उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधील.


आणि सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरात राहणारे याजक व संदेष्टे ह्यांना असे विचारण्यास पाठवले की, “आम्ही वर्षानुवर्ष करत आलो तसे पाचव्या महिन्यात एकान्ती बसून रुदन करावे काय?”


तेव्हा राजा दवेगास म्हणाला, “चल, तू जाऊन त्या याजकांवर तुटून पड.” तेव्हा अदोमी दवेग याजकांवर तुटून पडला. त्या दिवशी सणाचे एफोद धारण करणार्‍या पंचाऐंशी पुरुषांचा त्याने वध केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan