Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 2:68 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

68 पितृकुळातील कित्येक प्रमुख पुरुष यरुशलेमेतील परमेश्वराच्या मंदिराकडे आले तेव्हा देवाचे मंदिर पूर्ववत उभे करण्यासाठी त्यांनी स्वखुशीने अर्पणे दिली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

68 हे सर्वजण यरूशलेमेत परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी खुशीने भेटी दिल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

68 जेव्हा ते यरुशलेमात याहवेहच्या मंदिरात आले, काही कुलप्रमुखांनी परमेश्वराच्या भवनाची पुनर्बांधणी करण्यास त्या जागीच स्वेच्छेने दाने दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 2:68
20 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराच्या दूताने गादाला आज्ञा केली, “तू दाविदाला सांग की तू वरती जाऊन अर्णान यबूसी ह्याच्या खळ्यात परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांध.”


मग दावीद म्हणाला, “परमेश्वर देवाचे मंदिर हेच आणि इस्राएलाचे होमबली अर्पण करण्याची वेदी हीच.” मंदिराच्या उभारणीची पूर्वतयारी


मग परमेश्वराने यरुशलेमेस मोरिया डोंगरावर शलमोनाचा बाप दावीद ह्याला दर्शन दिले होते त्या अर्णान यबूसी ह्याच्या खळ्यात दाविदाने नेमलेल्या स्थानी मोरिया डोंगरावर मंदिर बांधण्याचे काम शलमोनाने सुरू केले.


त्यांचे उंट चारशे पस्तीस व त्यांची गाढवे सहा हजार सातशे वीस होती.


त्यांनी आपल्या शक्तीनुसार एकसष्ट हजार दारिक1 सोने पाच हजार माने1 चांदी आणि शंभर याजकीय वस्त्रे भांडारात पावती केली.


त्यांनी वेदीची स्थापना पूर्वीच्या स्थानी केली; कारण त्यांना आजूबाजूच्या राष्ट्रांची दहशत वाटत होती; तिच्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण अर्थात नित्य सांजसकाळची होमार्पणे ते करू लागले.


आम्ही दास तर आहोत, तरी आमच्या दास्यात देवाने आमचा त्याग केला नाही; उलट त्याने पारसदेशीय राजाच्या द्वारे आमच्यावर कृपादृष्टी केली आहे, ह्यासाठी की आम्ही नवजीवन पावून आमच्या देवाचे मंदिर उभारावे, त्याच्या मोडतोडीची दुरुस्ती करावी, आणि यहूदा व यरुशलेम ह्यांत आम्हांला आश्रयस्थान मिळावे.


तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत.


इस्राएल लोकांना असे सांग की त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे; ज्या कोणाची मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारावे.


नंतर ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्याने दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणले.


जे करण्याविषयी परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्राएल लोकांनी स्वेच्छेने परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पणे आणली, ज्या ज्या स्त्रीपुरुषांच्या अंत:करणात स्फूर्ती झाली त्यांनी त्यांनी ही अर्पणे आणली.


आणि पवित्रस्थानाच्या सेवेसाठी, म्हणजे ते बांधण्यासाठी इस्राएल लोकांनी जे एकंदर अर्पण आणले होते ते त्यांनी मोशेकडून घेतले. लोकांनी रोज सकाळी आपली स्वसंतोषाची अर्पणे त्याच्याजवळ आणण्याचा क्रम चालू ठेवला.


कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या-त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते; नसेल तसे नाही.


कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो.


प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan