सर्व मंडळीच्या तर्फे आमचे सरदार नेमावेत आणि आमच्या देवाचा भडकलेला तीव्र कोप आमच्यावरून दूर होईपर्यंत आणि ह्या प्रकरणाचे निराकरण होईपर्यंत आमच्या नगरांतल्या ज्या रहिवाशांनी अन्य जातींच्या स्त्रिया केल्या आहेत त्यांनी नेमलेल्या वेळी यावे, आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक नगराचे वडील जन व न्यायाधीश ह्यांनीही यावे.”