एज्रा 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने जे लोक पाडाव करून बाबेलास नेले होते त्यांतले त्या मुलखात राहणारे बंधमुक्त होऊन यरुशलेमास व यहूदातील आपापल्या नगरी परत गेले ते हे : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराने बाबेलास नेलेले यरूशलेम आणि यहूदा प्रांतातील बंद कैदी मुक्त होऊन आपापल्या नगरात परतले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने जे लोक धरून बाबेलला नेले होते, त्यातील जे बंदिवासातून प्रांतात परतले, त्यांच्या नावांची ही यादी आहे (ते यरुशलेम व यहूदीया येथे येऊन आपआपल्या गावी परतले. Faic an caibideil |
त्या वेळेस शिवान महिन्याच्या म्हणजे तिसर्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावण्यात आले आणि मर्दखयाच्या सांगण्याप्रमाणे इस्राएलाच्या अधिपतींना आणि हिंदुस्तानापासून कूश देशापर्यंतच्या एकशे सत्तावीस परगण्यांचे अधिपती व सरदार ह्यांना प्रत्येक प्रांताच्या लिपीत व निरनिराळ्या लोकांच्या भाषांत आणि यहूद्यांना त्यांच्या लिपीत व भाषेत खलिते पाठवण्यात आले.