Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 10:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मग एज्रा देवाच्या मंदिरापुढून उठला आणि यहोहानान बिन एल्याशीब ह्याच्या कोठडीत गेला; तेथे तो गेला तेव्हा त्याने अन्नपाणी सेवन केले नाही, कारण बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकास्तव तो शोक करीत राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मग एज्रा देवाच्या मंदिराच्या समोरच्या भागातून उठून एल्याशीबाचा मुलगा यहोहानान याच्या खोलीत गेला. यहोहानाने एज्रा समोर अन्नपाण्याला स्पर्शही केला नाही. कारण तो बंदीवासातून आलेल्या अविश्वासणाऱ्यासाठी शोक करीत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मग एज्रा परमेश्वराच्या भवनापासून उठला व एल्याशीबाचा पुत्र यहोहानानच्या खोलीवर गेला, त्याने अन्नपाणी घेण्याचे नाकारले, कारण बंदिवासातून परत आलेल्या इस्राएलांच्या विश्वासघातासाठी तो शोक करीत राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 10:6
16 Iomraidhean Croise  

एज्रा देवाच्या मंदिरापुढे पडून रडत असता व प्रार्थना करून पापांगीकार करत असता इस्राएल स्त्रीपुरुष व मुलेबाळे ह्यांचा मोठा समुदाय त्याच्याजवळ जमा झाला; लोक धायधाय रडत होते.


मग त्याने यहूदा व यरुशलेम ह्यांत राहणार्‍या बंदिवासातून परत आलेल्या सर्व लोकांना जाहीर केले की, तुम्ही यरुशलेमेत एकत्र व्हा;


मग बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकांसंबंधाने देवाचे वचन ऐकून ज्या लोकांचा थरकाप झाला, ते सगळे माझ्याजवळ जमा झाले, व मी संध्याकाळच्या अर्पणसमयापर्यंत चिंताक्रांत होऊन बसलो.


येशूवाला योयाकीम झाला, योयाकीमाला एल्याशीब झाला, एल्याशीबाला योयादा झाला,


एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दूवा ह्यांच्या काळात लेवी आणि दारयावेश पारसाच्या कारकिर्दीतले याजक हे त्यांच्या पितृकुळाचे मुख्य होते.


मुख्य याजक एल्याशीब ह्याचा पुत्र योयादा ह्याच्या पुत्रांपैकी एक जण सनबल्लट होरोनी ह्याचा जावई होता; मी त्याला आपल्याजवळून हाकून लावले.


त्याने तोबियासाठी एक मोठी कोठडी तयार केली होती; त्या कोठडीत पूर्वी अन्नबलीची सामग्री, ऊद, पात्रे आणि लेवी, गायक व द्वारपाळ ह्यांना शास्त्राज्ञेप्रमाणे द्यायचे धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे दशमांश, व याजकांना द्यायची समर्पित अंशांची अर्पणे ही ठेवत असत.


मग मुख्य याजक एल्याशीब व त्याचे याजकबांधव उठून मेंढेवेस बांधू लागले; त्यांनी तिची प्रतिष्ठापना करून तिला कवाडेही लावली; हमेआ बुरुजापर्यंत, हनानेल बुरुजापर्यंत त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली.


त्याच्यानंतर कोट वळसा घेतो तेथून मुख्य याजक एल्याशीब ह्याच्या घराच्या दारापर्यंत बारूख बिन जब्बई ह्याने आस्थेने दुसर्‍या एका भागाची डागडुजी केली.


त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही; माझ्या स्वतःच्या मनोरथापलीकडे2 मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत.


माझे हृदय गवताप्रमाणे वाळून करपले आहे, कारण मला अन्न खाण्याचेही भान राहत नाही.


मोशे तेथे परमेश्वराबरोबर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता; त्याने भाकर खाल्ली नाही, तो पाणीही प्यायला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे दहा वचने लिहून ठेवली.


त्या दिवशी तुम्ही रडावे, शोक करावा, केस तोडावे, गोणपाट नेसावे असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने सांगितले होते;


हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोणताट नेसणे व अंगावर राख उधळणे हे चालू केले.


तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून पाप केले व त्याला संतापवले; तुम्ही केलेल्या ह्या पापामुळे मी परमेश्वरापुढे पूर्वीप्रमाणेच चाळीस दिवस व चाळीस रात्री पालथा पडून राहिलो; त्या अवधीत मी भाकर खाल्ली नाही व पाणीही प्यालो नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan