Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तर आता आमच्या स्वामीच्या उपदेशानुसार आणि आमच्या देवाच्या मसलतीचा ज्यांना धाक आहे त्यांच्या उपदेशानुसार आम्ही असल्या सर्व स्त्रिया व त्यांच्या पोटी झालेली संतती काढून लावतो, असा करार आपल्या देवाशी करू या; हे सर्व आपण नियमशास्त्राप्रमाणे करू या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तर आता, प्रभूच्या मसलतीप्रमाणे आणि आमच्या देवाच्या आज्ञेवरून थरथर कापतात त्यांच्या मताप्रमाणे सर्व त्या स्त्रिया आणि त्यांची संतती यांना देशाबाहेर घालवून देण्याची आपल्या देवाशी करार करावा. हे नियमशास्त्राप्रमाणे करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आता जे आमच्या परमेश्वराचे भय धरतात व त्यांच्या आज्ञा पाळतात, ते आपण या स्त्रियांना सोडून देण्याचे वचन देऊ या. माझ्या स्वामीच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यांना त्यांच्या मुलांबाळांसह परत पाठवून देऊ. सर्वकाही परमेश्वराच्या नियमानुसार झाले पाहिजे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 10:3
25 Iomraidhean Croise  

ह्यानंतर राजा व प्रजा ह्यांनी परमेश्वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादाने त्यांच्याकडून परमेश्वराशी करार करवला; तसाच त्याने राजा व प्रजा ह्यांच्यामध्येही करार करवला.


आता माझ्या मनात आहे की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी आपण करार करावा, म्हणजे त्याचा आमच्यावरील संताप दूर होईल.


आणि यहूदाला देवाचा असा वरदहस्त प्राप्त झाला की राजाने व सरदारांनी परमेश्वराच्या वचनानुसार जी आज्ञा केली ती पाळण्यास ते एकचित्ताने तत्पर झाले.


“हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरासंबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे आणि इस्राएल व यहूदा ह्यांत जे शिल्लक राहिले आहेत त्यांच्यातर्फे परमेश्वराला प्रश्‍न करा. ह्या ग्रंथात जे सर्व लिहिले आहे ते करण्याच्या बाबतीत आमच्या वाडवडिलांनी देवाची आज्ञा पाळली नाही म्हणून परमेश्वराने क्रोधाची वृष्टी आमच्यावर केली आहे, ती फार मोठी आहे.”


तुझे हृदय मृदू झाले, तू देवापुढे नम्र झालास आणि ह्या स्थानाविरुद्ध व येथल्या रहिवाशांविरुद्ध मी सांगितले ते ऐकून तू दीन होऊन आपली वस्त्रे फाडून माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो.


तर आता आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर आपले पाप कबूल करा, त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करा आणि ह्या देशाचे लोक व अन्य जातींच्या स्त्रिया ह्यांच्यापासून निराळे व्हा.”


ह्या सर्वांनी परदेशीय बायका केल्या होत्या; आणि त्यांच्यापैकी कित्येकांच्या पोटी त्यांना मुले झाली होती.


मग यहूदा व बन्यामीन ह्यांतील सर्व लोक तीन दिवसांच्या आत यरुशलेमेत एकत्र झाले; हे सर्व नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी घडले. सर्व लोक देवाच्या मंदिराच्या चौकात सदरील कारणास्तव आणि पावसाच्या झडीमुळे थरथर कापत बसून राहिले.


मग बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकांसंबंधाने देवाचे वचन ऐकून ज्या लोकांचा थरकाप झाला, ते सगळे माझ्याजवळ जमा झाले, व मी संध्याकाळच्या अर्पणसमयापर्यंत चिंताक्रांत होऊन बसलो.


ज्यांनी आपली मोहर केली ते हेच : हखल्याचा पुत्र नहेम्या तिर्शाथा (प्रांताधिपती) व सिद्कीया,


त्यांना नियमशास्त्रात असे लिहिलेले आढळले की परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सातव्या महिन्याच्या पर्वणीस मांडवांत राहावे.


ह्या सर्व कारणांस्तव आम्ही दृढ करार करतो व लिहून देतो, आणि आमचे अधिपती, लेवी व याजक हे त्याच्यावर मोहर करीत आहेत.


तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो; तुझ्या निर्णयांना मी भितो.


आपल्या वर्तनक्रमाविषयी विचार करून मी तुझ्या निर्बंधांकडे पावले वळवली.


परमेश्वर म्हणतो, “ह्या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनलेल्या आहेत; म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत; पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडे मी पाहतो.


नियमशास्त्र व साक्ष ह्यांकडे पाहा! ह्याप्रमाणे ते न बोलल्यास त्यांच्यासाठी निश्‍चये प्रभातसमय नाही.


परमेश्वर त्याला म्हणाला, “नगरामधून, यरुशलेमेमधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर.”


जो करार तुमचा देव परमेश्वर आज तुमच्याशी करीत आहे व जे वचन शपथपूर्वक तुम्हांला देत आहे त्यात तुम्ही सामील व्हावे;


ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांना म्हणाले, “आम्ही दूर देशाहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करारमदार करा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan