Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 10:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मग एज्रा याजक उभा राहून त्यांना म्हणाला, ”तुम्ही आज्ञेचे उल्लंघन करून अन्य जातींच्या स्त्रियांशी विवाह केल्यामुळे इस्राएलाच्या अपराधांत भर घातली,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 एज्रा याजक त्यांच्यासमोर उभा राहून म्हणाला, “तुम्ही देवाचे वचन पाळले नाही. परक्या स्त्रियांशी तुम्ही विवाह केलेत. या कृत्यामुळे इस्राएलाच्या अपराधात तुम्ही भर टाकली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मग एज्रा याजक उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही विश्वासघात केला आहे, कारण तुम्ही गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केले आहेत आणि आपण इस्राएलचे पातक आणखीच वाढविले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 10:10
8 Iomraidhean Croise  

“ह्या पाडाव केलेल्या लोकांना आत आणू नका; तुम्ही जो संकल्प केला आहे त्याच्यामुळे आम्ही परमेश्वराचे अपराधी होऊ व आमच्या पापांत व दोषात भर पडेल; आमचा दोष तर मोठा आहे आणि इस्राएलावर बहुत कोप भडकला आहे.”


तर आता आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर आपले पाप कबूल करा, त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करा आणि ह्या देशाचे लोक व अन्य जातींच्या स्त्रिया ह्यांच्यापासून निराळे व्हा.”


मग यहूदा व बन्यामीन ह्यांतील सर्व लोक तीन दिवसांच्या आत यरुशलेमेत एकत्र झाले; हे सर्व नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी घडले. सर्व लोक देवाच्या मंदिराच्या चौकात सदरील कारणास्तव आणि पावसाच्या झडीमुळे थरथर कापत बसून राहिले.


तर आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून अमंगळ कृत्ये करणार्‍या ह्या लोकांशी सोयरीक करावी काय? अशाने तू आमच्यावर कोपायमान होऊन आम्हांला भस्म करशील आणि आमचा कोणी अवशेष उरू देणार नाहीस, असे नाही का तू करणार?


“हे माझ्या देवा, मला लाज वाटते. मला तुझ्यापुढे तोंड वर करण्यास शरम वाटते, कारण आमचे अपराध वाढून आमच्या डोक्यावरून गेले आहेत व आमचे दोष वाढून गगनास जाऊन पोहचले आहेत.


आता पाहा, इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध आणखी भडकावा म्हणून तुम्ही आपल्या वडिलांच्या जागी त्यांची पातकी पोरे निपजला आहात.


तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan