Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 एज्रा देवाच्या मंदिरापुढे पडून रडत असता व प्रार्थना करून पापांगीकार करत असता इस्राएल स्त्रीपुरुष व मुलेबाळे ह्यांचा मोठा समुदाय त्याच्याजवळ जमा झाला; लोक धायधाय रडत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 एज्रा प्रार्थना करत असतांना आणि पापांची कबुली देत असतांना देवाच्या मंदिरापुढे पडून रडत व आक्रोश करत होता त्यावेळी इस्राएली बायका-पुरुष, मुले यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला होता ते लोक मोठ्याने रडत होते

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 परमेश्वराच्या भवनासमोर जमिनीवर पडून एज्रा रडत प्रार्थना करीत व पापांगिकार करीत असताना, इस्राएली पुरुष, स्त्रिया व मुले यांचा एक फार मोठा समुदाय त्याच्याभोवती जमा झाला. तेही अत्यंत दुःखाने रडू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 10:1
29 Iomraidhean Croise  

तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्राएल ह्या स्थलाकडे तोंड करून तुझी विनवणी करतील तिच्याकडे तू कान दे; स्वर्गातील तुझ्या निवासस्थानी तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर.


परमेश्वर त्याला म्हणाला, “तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विनवणी मी ऐकली आहे; हे जे मंदिर तू बांधले आहेस त्याला माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी ते पवित्र केले आहे; माझी दृष्टी व माझे चित्त त्यावर सतत राहील.


तेव्हा सर्व यहूदी आपली मुलेबाळे व स्त्रियांसह परमेश्वरासन्मुख उभे राहिले.


‘तलवार, दैवी क्षोभ, मरी अथवा दुष्काळ आमच्यावर आला तर ह्या मंदिरास तुझे नाम दिले आहे त्याच्यासमोर व तुझ्यासमोर आम्ही उभे राहून आमच्या संकटसमयी तुझा धावा करू, तेव्हा तू आमचे ऐकून आमचा बचाव करशील.’


मग एज्रा देवाच्या मंदिरापुढून उठला आणि यहोहानान बिन एल्याशीब ह्याच्या कोठडीत गेला; तेथे तो गेला तेव्हा त्याने अन्नपाणी सेवन केले नाही, कारण बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकास्तव तो शोक करीत राहिला.


हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो; मी उपास करून स्वर्गींच्या देवाची प्रार्थना केली की,


तुझे सेवक इस्राएल लोक ह्यांच्यासाठी मी तुझा दास ह्या वेळी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे; ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पाहा; आम्ही इस्राएल लोकांनी तुझ्याविरुद्ध पातके केली आहेत, ती मी कबूल करतो; मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे.


अवशिष्ट लोकांनी म्हणजे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व नथीनीम ह्यांनी आणि देवाचे नियमशास्त्र पाळण्यासाठी देशोदेशीच्या लोकांतून जे वेगळे झाले होते त्या सर्वांनी ज्यांना अक्कल व समज होती अशा आपल्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांच्यासह


मग नहेम्या तिर्शाथा (प्रांताधिपती), एज्रा याजक, शास्त्री आणि लोकांना शिकवणारे लेवी हे सर्व लोकांना म्हणाले, “हा दिवस तुमचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र आहे, तर शोक करू नका; रडू नका.” कारण ते लोक नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले होते.


लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह वाहतात.


मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीती लपवून ठेवली नाही; “मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन” असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस. (सेला)


पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकान्ती शोकाकुल होईल; परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेन, माझ्या डोळ्यांतून टपटप आसवे गळतील.


अहाहा! माझे मस्तक जलसंचय, माझे डोळे अश्रूंचा झरा असते तर किती बरे होते! म्हणजे माझ्या लोकांच्या कन्येच्या वध पावलेल्यांबद्दल मी रात्रंदिवस अश्रुपात केला असता.


मी बोलत व प्रार्थना करीत असता, माझे पाप व माझे लोक इस्राएल ह्यांचे पाप कबूल करीत असता आणि माझ्या देवाच्या पवित्र पर्वतासाठी माझा देव परमेश्वर ह्याच्याकडे विनवणी करीत असता,


तुम्ही शब्दांनिशी परमेश्वराकडे वळा; त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर; कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू.


आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेमेच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी ह्यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्यांनी विंधले त्या माझ्याकडे2 ते पाहतील; एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्याच्यासाठी शोक करतील; ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील.


त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला.


मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरता रडत रडत म्हणाला,


तेव्हा कर्नेल्य म्हणाला, “आज चार दिवस झाले, मी आपल्या घरी तिसर्‍या प्रहरी प्रार्थना [व उपास] करत होतो; तेव्हा पाहा, तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष माझ्यापुढे उभा राहून म्हणाला,


मग असे झाले की, ते दिवस संपल्यावर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो; तेव्हा स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हांला नगराबाहेर पोहचवले. तेथे समुद्राच्या किनार्‍यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली.


मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंत:करणामध्ये अखंड वेदना आहेत.


सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके आणि तुझ्या नगरातला उपरा ह्यांना जमव, म्हणजे ते ऐकून शिकतील आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरतील, आणि ह्या नियमशास्त्रातली सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील;


तेव्हा यहोशवाने आपले कपडे फाडले, आणि तो व इस्राएलाचे वडील जन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले; आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली.


इस्राएलाच्या सबंध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेबाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरे ह्यांच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवाने वाचून दाखवल्या; त्यांतला एकही शब्द त्याने गाळला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan