Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्यांची यादी येणेप्रमाणे : सोन्याच्या तीस पराती, चांदीच्या एक हजार पराती, एकोणतीस सुर्‍या,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्यांची संख्या याप्रमाणे होती: तीस सोन्याच्या पराती, एक हजार चांदीच्या पराती, एकोणतीस सुऱ्या,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 यामध्ये पुढील वस्तूंचा समावेश होता: सोन्याच्या पराती 30, चांदीच्या पराती 1,000, चांदीची पात्रे 29,

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 1:9
14 Iomraidhean Croise  

पेले, कातरी, कटोरे, चमचे व धुपाटणी ही शुद्ध सोन्याची करवली होती; तसेच मंदिराचा अंतर्भाग म्हणजे परमपवित्रस्थान ह्याच्या दारांची व मंदिराच्या म्हणजे पवित्रस्थानाच्या दारांची बिजागरे सोन्याची करवली होती.


अग्निपात्रे, कटोरे वगैरे जेवढी सोन्याची होती त्यांचे सोने व जी चांदीची होती त्यांची चांदी गारद्यांच्या सरदाराने नेली.


ते सर्व काम आटोपल्यावर बाकी राहिलेले पैसे त्यांनी नेऊन राजाला व यहोयादाला दिले; परमेश्वराच्या मंदिरा-प्रीत्यर्थ त्या पैशांची सेवेची व अर्पणाची पात्रे, चमचे आणि सोन्यारुप्याची इतर पात्रे बनवली. यहोयादाच्या आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात होमबली नित्य अर्पण करीत असत.


हूरामाने हंडे, फावडी व कटोरे केले. ह्या प्रकारे हूरामाने शलमोन राजासाठी देवमंदिराचे जे काम करायचे होते ते संपवले.


तशीच त्याने दहा मेजे करून उजवीकडे पाच व डावीकडे पाच अशी मंदिरात ठेवली. त्याने सोन्याचे शंभर कटोरे केले.


सोन्याचे तीस कटोरे, चांदीचे दुसर्‍या प्रकारचे चारशे दहा कटोरे व इतर पात्रे एक हजार.


मी त्यांच्या हाती साडेसहाशे किक्कार चांदी, शंभर किक्कार चांदीची पात्रे, शंभर किक्कार1 सोने,


हजार दारिक2 सोन्याचे वीस कटोरे आणि सुवर्णतुल्य उजळ पितळेची दोन पात्रे मी त्यांना तोलून दिली.


मग यरुशलेमेतील आमच्या देवाच्या मंदिराप्रत नेण्यासाठी याजक व लेवी ह्यांनी ते सोनेरुपे व ती पात्रे तोलून घेतली.


त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;


मग तिच्या आईने तिला पढवल्याप्रमाणे ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शीर तबकात घालून मला येथे आणून द्या.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan