Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने ह्या राजाच्या मनास स्फूर्ती दिली; तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात जाहीर केले व लेखी फर्मानही पाठवले, ते असे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यिर्मयाच्या तोंडून परमेश्वराने दिलेले वचन पूर्ण व्हावे याकरीता परमेश्वराने राजा कोरेश्याच्या आत्म्याला प्रेरणा दिली. कोरेशाने त्याच्या राज्यामध्ये घोषणा केली, त्याने जे सांगितले व लिहिले होते ते असे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यिर्मयाहने सांगितलेला याहवेहचा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून पर्शियाचा राजा कोरेशच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी पुढील जाहीरनामा लिहून आपल्या संपूर्ण साम्राज्यात पाठवावा अशी इच्छा याहवेहने राजाच्या मनात निर्माण केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 1:1
23 Iomraidhean Croise  

तेव्हा यरुशलेमेतील परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी वरती जाण्यास देवाने ज्यांच्या मनास स्फूर्ती दिली ते यहूदा व बन्यामीन ह्यांच्या पितृकुळांचे प्रमुख, याजक व लेवी उठून सिद्ध झाले.


पण जरूब्बाबेल, येशूवा व इस्राएलाच्या पितृकुळांचे इतर प्रमुख त्यांना म्हणाले, “आमच्या देवासाठी मंदिर बांधण्याच्या बाबतीत आमच्याशी तुम्हांला काही कर्तव्य नाही; तर पारसाचा राजा कोरेश ह्याच्या आज्ञेप्रमाणे आम्हीच एकत्र होऊन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधणार.”


हाग्गय संदेष्टा आणि जखर्‍या बिन इद्दो ह्यांच्या संदेशामुळे यहूदी वडील जन मंदिर बांधत राहिले आणि त्यात त्यांना यश आले. इस्राएलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दारयावेश व अर्तहशश्त ह्यांच्या फर्मानांबरहुकूम त्यांनी ते मंदिर बांधून पुरे केले.


त्यांनी बेखमीर भाकरीचा सण सात दिवस आनंदाने पाळला, कारण परमेश्वराने त्यांना आनंदित केले होते आणि इस्राएलाचा देव ह्याच्या मंदिराच्या कामी त्यांच्या हातांना जोर यावा म्हणून त्याने अश्शूरच्या राजाचे मन त्यांना अनुकूल केले होते.


‘कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यरुशलेमेतील देवाच्या मंदिरासंबंधाने राजाने जो ठराव केला तो असा : ज्या स्थानी यज्ञ करतात तेथे देवाचे मंदिर बांधावे व त्याचा पाया खंबीर घालावा; त्याची उंची साठ हात व रुंदी साठ हात असावी;


यरुशलेमेतील देवाचे मंदिर शोभिवंत करावे अशी इच्छा राजाच्या मनात ज्याने उत्पन्न केली आहे तो आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर धन्य!


त्यांचा पाडाव करणार्‍या सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी त्याने दया उत्पन्न केली.


राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.


मी कोरेशाविषयी म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल.’ तो यरुशलेमेविषयी म्हणेल, ‘ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल.”’


परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्‍त आहे; त्याच्यापुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे; राजांना आपल्या कमरा सोडायला मी लावतो; त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करतो.


बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने :


परमेश्वर असे म्हणतो की बाबेलची सत्तर वर्षे भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हांला ह्या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्यासंबंधाने पूर्ण करीन.


त्यांच्यासह ढाल व शिरस्त्राण धारण केलेले पारस, कूश व पूट,


दानीएल हा कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत तेथे राहिला.


नबुखद्नेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी स्वप्ने पडली, तेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली.


मग पृथ्वीवरील सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणार्‍या लोकांना, दारयावेश राजाने असे लिहून कळवले की, “तुमचे कल्याण असो!”


मी दानीएल शास्त्रग्रंथावरून समजलो की, यरुशलेमेच्या ओसाड दशेचा काळ पुरा होण्यास सत्तर वर्षे लागतील, असे परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला प्राप्त झाले होते.


तो म्हणाला, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, ‘परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणार्‍याची वाणी’ मी आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan