Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 परमेश्वर त्याला म्हणाला, “नगरामधून, यरुशलेमेमधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परमेश्वर देव त्यांना म्हणाला, “यरूशलेमेच्या मध्य भागातून प्रवेश करा, जे पुरुष विव्हळ झाले, त्यांच्या माथ्यावर खुण करा, आणि शहरात केलेल्या सगळ्या अपवित्र गोष्टींसाठी उसासे टाका.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आणि याहवेहने त्याला म्हटले, “संपूर्ण यरुशलेम शहरातून जा आणि त्यात अमंगळ कृत्ये केल्याबद्दल जे दुःख व विलाप करतात त्यांच्या कपाळावर एक चिन्ह कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 9:4
29 Iomraidhean Croise  

त्यांना असे सांगण्यात आले की, ‘पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला’ उपद्रव करू नये; तर ज्या माणसांच्या ‘कपाळांवर’ देवाचा ‘शिक्का’ नाही त्यांना मात्र उपद्रव करावा.


त्याने आम्हांला मुद्रांकित केले व आमच्या अंत:करणात आपला आत्मा हा विसार दिला.


नंतर मी पाहिले, तो पाहा, कोकरा सीयोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला; त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव ‘कपाळावर’ लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते;


नंतर ‘मी राजासने पाहिली,’ त्यांच्यावर ‘कोणी बसले होते;’ त्यांना ‘न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता;’ आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता, आणि ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळांवर व आपल्या हातांवर त्याची खूण धारण केलेली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले; ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.


तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे : “प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.”


लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह वाहतात.


देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात.


पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकान्ती शोकाकुल होईल; परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेन, माझ्या डोळ्यांतून टपटप आसवे गळतील.


आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खूण असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हांला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही.


दुर्जन तुझ्या नियमशास्त्राचा त्याग करतात, म्हणून मला फार संताप येतो.


ज्या घरात त्याचे मांस खायचे असेल त्या घराच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे.


कारण जो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो : “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो.


तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांशी बोलले; ते परमेश्वराने कान देऊन ऐकले आणि परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे ह्यांची एक स्मरणवही त्याच्यासमोर लिहिण्यात आली.


ह्यास्तव हे मानवपुत्रा, कंबर मोडेल असा उसासा टाक, त्यांच्यासमक्ष कष्टाने उसासा टाक


प्रभू परमेश्वर म्हणतो, “आपले हातपाय आपटून म्हण : इस्राएल घराण्याच्या सर्व अमंगळ दुष्कर्मांचा धिक्कार असो; ते तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी मरतील.


मला भीती वाटते की, मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्यापुढे खाली पाहायला लावील; आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण आचरलेल्या अशुद्धपणाचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्‍चात्ताप केला नाही, अशा पुष्कळ लोकांविषयी मला शोक करावा लागेल.


“हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरासंबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे, प्रजेच्यातर्फे व सर्व यहूदाच्यातर्फे परमेश्वराला प्रश्‍न करा; आमच्या वाडवडिलांनी ह्या ग्रंथातली वचने ऐकली नाहीत व आमच्यासाठी जे ह्यात लिहिले आहे ते पाळले नाही म्हणून परमेश्वराचा आमच्यावर मोठा क्रोध भडकला आहे.”


ह्यापुढे कोणी मला त्रास न देवो; कारण मी आपल्या शरीरावर प्रभू येशूच्या खुणा धारण करून आहे.


परमेश्वर त्याला म्हणाला, “तर मग जो कोणी काइनाला ठार मारील त्याचा सातपट सूड घेण्यात येईल.” आणि काइन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खूण नेमून दिली.


मला ऐकू येईलसे तो त्या बाकीच्यांना म्हणाला, “त्याच्यामागून नगरात जा व संहार करा; कृपादृष्टी करू नका; गय करू नका,


वृद्ध, तरुण व कुमारी, मुले व स्त्रिया ह्यांची निखालस कत्तल करा; पण ज्यांच्यावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नका; माझ्या पवित्रस्थानापासून आरंभ करा.” तेव्हा मंदिरापुढे असलेल्या वडिलांपासून त्यांनी आरंभ केला.


तुम्ही घागरींच्या घागरी द्राक्षारस पिता, उत्तम तेलांनी आपणांस माखता, योसेफावरील आपत्तीबद्दल तुम्ही खेद करत नाही.


त्या समयी असे होईल की मी दिवट्या घेऊन यरुशलेमेची तपासणी करीन; व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की, ‘परमेश्वर बरे करत नाही व वाईटही करत नाही,’ त्यांचा मी समाचार घेईन.


जे तुझे लोक सणाच्या मेळ्याची आठवण करून रडतात त्यांना मी एकत्र मिळवीन; त्यांच्यावर निंदेचा भार पडला आहे.


कारण परमेश्वर मिसर्‍यांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे; ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लावलेले परमेश्वर पाहील ते ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणार्‍याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan