यहेज्केल 9:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा पाहा, उत्तरेकडील वरच्या वेशीने सहा पुरुष आपल्या हाती विध्वंसक हत्यारे घेऊन आले; त्यांच्यामध्ये शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेला एक मनुष्य होता; त्याच्या कंबरेनजीक कारकुनाची दऊत होती. ते आत जाऊन पितळी वेदीजवळ उभे राहिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग पहा! उत्तर दिशेने प्रवेश व्दारातून सहा जण आपल्या हाती जनावर ठार करणारे हत्यार आणि अंगात तागाचे वस्त्र परिधान केलेले, एका बाजूस शास्रांचे उपकरण होते, मग ते जाऊन पितळेच्या वेदीजवळ उभे राहीले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि वरील दरवाजा, ज्याचे मुख उत्तरेकडे होते त्या दिशेकडून सहा पुरुष येत असलेले मी पाहिले, प्रत्येकाच्या हाती घातक शस्त्रे होती. त्यांच्याबरोबर एक पुरुष होता ज्याने तागाची वस्त्रे घातली होती व त्याच्याकडे लेखन सामुग्री होती. ते येऊन कास्य वेदीजवळ उभे राहिले. Faic an caibideil |
मी प्रभूला वेदीजवळ उभे राहिलेले पाहिले; तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यांवर प्रहार कर म्हणजे उंबरठे हलतील; त्यांचे तुकडे करून त्या सर्वांच्या डोक्यावर पाड; त्यांच्यातले शेष उरतील ते मी तलवारीने वधीन; त्यांतला कोणी पळून जाऊ पाहील, पण त्याला पळून जाता येणार नाही; त्यांतला कोणी निसटून जाऊ पाहील, पण तो निभावणार नाही.