Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 9:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग त्याने मला ऐकू येईलसे मोठ्याने म्हटले, “नगररक्षकहो, तुम्ही सगळे आपली विध्वंसक हत्यारे हाती घेऊन इकडे या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तेव्हा देवाने मोठ्या आवाजाने मला हाक मारली, आणि म्हणाले, “शहर रक्षकाला येऊ द्या, प्रत्येकाच्या हाती हल्ला व हानी करणारे हत्यार असेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 नंतर मी त्याला उंच आवाजात बोलताना ऐकले, “शहरावर न्यायनिवाडा आणण्यासाठी ज्यांना नेमले आहे त्यांना बोलवा, प्रत्येकाच्या हाती शस्त्र असावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 9:1
11 Iomraidhean Croise  

मग ते यज्ञ करण्यासाठी व होमबली अर्पण करण्यास आत गेले. इकडे येहूने ऐंशी पुरुष बाहेर ठेवले होते त्यांना त्याने सांगितले की, “जी माणसे मी तुमच्या हवाली करीन त्यांतला कोणी निसटून गेला तर जो त्याला जाऊ देईल त्याचा प्राण त्याच्याऐवजी घेण्यात येईल.”


देवाने यरुशलेमाचा नाश करायला एक देवदूत पाठवला; तो त्याचा नाश करणार हे परमेश्वराने पाहिले तेव्हा ह्या अरिष्टाविषयी परमेश्वराला वाईट वाटले व त्या नाश करणार्‍या देवदूताला तो म्हणाला, “आता पुरे कर, आपला हात आटोप.” त्या वेळी परमेश्वराचा दूत अर्णान1 यबूसी ह्याच्या खळ्यानजीक होता.


कारण परमेश्वर मिसर्‍यांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे; ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लावलेले परमेश्वर पाहील ते ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणार्‍याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही.


तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तेव्हा मी म्हणालो, “हा मी आहे! मला पाठव.”


सीयोनेच्या दिशेकडे ध्वजा उभारा; आश्रयासाठी पळा, थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट, मोठा नाश आणत आहे.


मी नगराचा नाश करण्यास आलो होतो तेव्हाच्या दृष्टान्ता-सारखा दृष्टान्त मी पाहिला; खबार नदीतीरी जो दृष्टान्त मी पाहिला तसे दृष्टान्त माझ्या दृष्टीस पडले; तेव्हा मी उपडा पडलो.


तो मोठ्याने म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे. ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र’ व पाण्याचे झरे ‘निर्माण केले,’ त्याला नमन करा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan