Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 8:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, आपले डोळे वर करून उत्तर दिशेकडे पाहा. मी उत्तरेस दृष्टी लावली तर वेदी-वेशीच्या उत्तरेस मंदिराच्या प्रवेशमार्गात ही ईर्ष्येस पेटवणारी मूर्ती होती.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग तो मला म्हणाला “मानवाच्या मुला, उत्तरेकडे आपली नजर लाव जी वेदीकडे जाते,” प्रवेशव्दारातही चिडवणारी मूर्ती होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, उत्तरेकडे पाहा.” म्हणून मी पाहिले आणि वेदीच्या उत्तरेकडील द्वाराच्या प्रवेश स्थानात मला ती ईर्षेची मूर्ती दिसली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 8:5
8 Iomraidhean Croise  

त्याने हाताच्या आकृतीचे काही पुढे करून माझ्या डोक्यावरील एक बट धरली आणि आत्म्याने आकाश व पृथ्वी ह्यांच्या दरम्यान मला उचलून नेऊन दिव्यदृष्टीने यरुशलेम येथे उत्तरेस असलेल्या आतल्या अंगणाच्या दरवाजाजवळ आणले; तेथे ईर्ष्येस पेटवणार्‍या मूर्तीचे आसन होते.


डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या शिंदळकीने व दुष्टतेने देश भ्रष्ट केला आहेस.


तर ज्या मंदिराला माझे नाम दिले आहे ते भ्रष्ट करण्यासाठी त्यात त्यांनी आपल्या अमंगल वस्तू स्थापल्या.


त्यांनी आपल्या उच्च स्थानांमुळे त्याला राग आणला; आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्याला ईर्ष्या आणली.


उत्तर सीमेवरील सीयोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे.


कारण यहूदावंशाने माझ्या दृष्टीने जे वाईट ते केले आहे; माझे नाम ज्या मंदिरास दिले आहे ते भ्रष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या अमंगळ वस्तू त्यात ठेवल्या आहेत, असे परमेश्वर म्हणतो.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू माझे पवित्रस्थान आपल्या सर्व तिरस्करणीय वस्तूंनी व अमंगळ कर्मांनी भ्रष्ट केले, म्हणून खातरीने मी तुझ्यावरची कृपादृष्टी काढून घेईन; गय करणार नाही, दया करणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan