Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्याने हाताच्या आकृतीचे काही पुढे करून माझ्या डोक्यावरील एक बट धरली आणि आत्म्याने आकाश व पृथ्वी ह्यांच्या दरम्यान मला उचलून नेऊन दिव्यदृष्टीने यरुशलेम येथे उत्तरेस असलेल्या आतल्या अंगणाच्या दरवाजाजवळ आणले; तेथे ईर्ष्येस पेटवणार्‍या मूर्तीचे आसन होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग देवाने दाखवलेल्या दृष्टांतात हाताच्या आकृती प्रमाणे येऊन माझ्या डोक्याच्या केसास धरुन देवाच्या आत्म्याने मला स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्यभागी उचलून घेतले, त्याने मला यरूशलेमेला नेले उत्तरेच्या आतील भागाच्या वेशी जवळ तेथे एक मूर्ती चिडवण्यासाठी उभी होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 हातांसारख्या दिसणार्‍या आकृतिसारखे त्याने काहीतरी पुढे केले व माझे डोक्याचे केस धरले. मग आत्म्याने मला पृथ्वी व आकाशाच्या दरम्यान वर उचलले आणि परमेश्वराच्या दृष्टान्तामध्ये त्याने मला यरुशलेमला, आतील अंगणाच्या उत्तरेकडील दरवाजाच्या प्रवेशाकडे नेले, जिथे ईर्षेस प्रवृत्त करणारी मूर्ती उभी होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 8:3
39 Iomraidhean Croise  

मी आपल्याकडून जाताच मला कळणार नाही अशा ठिकाणी परमेश्वराचा आत्मा आपणाला घेऊन जाईल; आणि मी जाऊन अहाबाला हे वर्तमान सांगितले व आपण त्याला आढळला नाहीत तर तो मला मारून टाकील. मी आपला दास तर बाळपणापासून परमेश्वराला भिऊन वागत आलो आहे.


परमेश्वरापुढे असलेली पितळेची वेदी जी मंदिरापुढे म्हणजे वेदी व परमेश्वराचे मंदिर ह्यांच्या दरम्यान होती ती तेथून काढून त्याने तयार केलेल्या ह्या वेदीच्या उत्तरेकडे ठेवली.


ते त्याला म्हणाले, “ऐका, आपल्या सेवकांजवळ पन्नास बळकट पुरुष आहेत; त्यांना आपल्या स्वामीचा शोध करण्यास जाऊ द्या; परमेश्वराच्या आत्म्याने त्याला उचलून एखाद्या पर्वतावर अथवा एखाद्या खोर्‍यात टाकले असेल.” तो म्हणाला, “कोणालाही पाठवू नका.”


आपण केलेली अशेरामूर्ती त्याने परमेश्वराच्या मंदिरात ठेवली; ह्या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलमोन ह्यांना परमेश्वर म्हणाला होता की, “हे मंदिर आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतून निवडून घेतलेले यरुशलेम ह्यात मी आपले नाम निरंतर ठेवीन;


त्यांनी आपल्या उच्च स्थानांमुळे त्याला राग आणला; आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्याला ईर्ष्या आणली.


आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस.


त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस; कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसर्‍या-चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो;


कारण तुला दुसर्‍या कोणत्याही देवाला नमन करायचे नाही; कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान आहे, तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे;


तर ज्या मंदिराला माझे नाम दिले आहे ते भ्रष्ट करण्यासाठी त्यात त्यांनी आपल्या अमंगल वस्तू स्थापल्या.


कारण यहूदावंशाने माझ्या दृष्टीने जे वाईट ते केले आहे; माझे नाम ज्या मंदिरास दिले आहे ते भ्रष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या अमंगळ वस्तू त्यात ठेवल्या आहेत, असे परमेश्वर म्हणतो.


मी खबार नदीच्या तीरी पकडून आणलेल्या लोकांत राहत होतो, तेव्हा तिसाव्या वर्षाच्या चौथ्या मासी पंचमीस असे झाले की आकाश दुभागून मला दिव्य दृष्टान्त दिसले.


तो मनुष्य गेला तेव्हा करूब मंदिराच्या उजवीकडे उभे होते आणि आतले अंगण मेघाने व्यापून टाकले होते.


मग आत्म्याने मला उचलून घेऊन परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वाभिमुख पूर्वेकडील द्वाराकडे आणले; तेव्हा पाहा, वेशीपुढे पंचवीस इसम होते; त्यांच्यामध्ये याजन्या बिन अज्जूर व पलट्या बिन बनाया हे लोकनायक माझ्या दृष्टीस पडले.


तेव्हा त्या आत्म्याने दृष्टान्तात मला उचलून घेऊन खास्दी देशात धरून आणलेल्या लोकांकडे आणले आणि जो दृष्टान्त मी पाहत होतो तो माझ्या डोळ्यांआड झाला.


मी पाहिले तेव्हा माझ्याकडे एक हात पुढे झाला; आणि पाहा, त्या हातात ग्रंथाचा पट होता;


तेव्हा आत्म्याने मला उचलून धरले आणि माझ्यामागून त्याच्या स्थानातून, परमेश्वराच्या वैभवाचा धन्यवाद असो, असा प्रचंड वेगाचा शब्द झालेला मी ऐकला.


मग आत्म्याने मला उचलून धरले, मी आपल्या मनाच्या संतापाने क्लेश पावलो, तेव्हा परमेश्वराचा वरदहस्त जोराने माझ्यावर आला.


परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला; आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोर्‍यात नेऊन ठेवले, तेथे अस्थीच अस्थी होत्या.


त्याने दिव्य दृष्टान्ताच्या द्वारे मला इस्राएल देशात नेऊन एका अतिशय उंच पर्वतावर ठेवले; त्यावर दक्षिणेस नगराच्या आकारासारखे काही होते.


तेव्हा आत्म्याने मला उचलून आतील अंगणात नेले, तेव्हा पाहा, परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरून गेले होते


त्यांनी आपला उंबरठा माझ्या उंबरठ्याशेजारी, आपले द्वारस्तंभ माझ्या द्वारस्तंभाशेजारी उभारले आणि माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती; अमंगळ कृत्ये करून त्यांनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावला म्हणून मी रागाने त्यांचा नाश केला.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू माझे पवित्रस्थान आपल्या सर्व तिरस्करणीय वस्तूंनी व अमंगळ कर्मांनी भ्रष्ट केले, म्हणून खातरीने मी तुझ्यावरची कृपादृष्टी काढून घेईन; गय करणार नाही, दया करणार नाही.


त्यांनी त्यांची केलेली भूषणे दिमाख दाखवण्यासाठी वापरली; त्यांनी त्याच्या अमंगळ मूर्ती व तिरस्करणीय वस्तू आपणांसाठी बनवल्या; म्हणून ते त्यांना अमंगळ वस्तूसमान वाटावे असे मी केले आहे.


तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, आपले डोळे वर करून उत्तर दिशेकडे पाहा. मी उत्तरेस दृष्टी लावली तर वेदी-वेशीच्या उत्तरेस मंदिराच्या प्रवेशमार्गात ही ईर्ष्येस पेटवणारी मूर्ती होती.”


तेव्हा पाहा, उत्तरेकडील वरच्या वेशीने सहा पुरुष आपल्या हाती विध्वंसक हत्यारे घेऊन आले; त्यांच्यामध्ये शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेला एक मनुष्य होता; त्याच्या कंबरेनजीक कारकुनाची दऊत होती. ते आत जाऊन पितळी वेदीजवळ उभे राहिले.


तेव्हा पाहा, एका हाताने मला स्पर्श केला, त्याच्या योगाने मी गुडघे व तळहात जमिनीवर टेकून थरथरत राहिलो.


तेव्हा मनुष्याप्रमाणे दिसणार्‍या एकाने मला स्पर्श करून माझ्यात त्राण आणले.


त्याच घटकेस मानवी हाताची बोटे प्रकट झाली व त्यांनी दीपवृक्षासमोर राजवाड्याच्या भिंतींच्या गिलाव्यावर काही लिहिले आणि हाताची बोटे लिहीत होती ती राज्याच्या दृष्टीस पडली.


मग ते पाण्यातून वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलिप्पाला घेऊन गेला म्हणून तो पुन्हा षंढाच्या दृष्टीस पडला नाही; नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करत चालला.


त्यांनी अन्य देवांच्या मागे लागून त्याला ईर्ष्येस पेटवले. अमंगळ कृत्ये करून त्याला चीड आणली.


देव नाही अशाच्या योगे त्यांनी मला ईर्ष्येस पेटवले, व्यर्थ वस्तूंच्या योगे त्यांनी मला चिडवले; म्हणून ज्यांचे राष्ट्र नव्हे अशांच्या योगे मी त्यांना ईर्ष्येस पेटवीन, एका मूढ राष्ट्राच्या योगे त्यांना चिडवीन.


कारण तुझा देव परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे; तो ईर्ष्यावान देव आहे.


त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसर्‍या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो;


कारण तुझ्यामध्ये असणारा तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. तुझा देव परमेश्वर ह्याचा क्रोध तुझ्यावर भडकून त्याने तुझा संहार करून तुला पृथ्वीवरून नष्ट करावे असे न होवो.


यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्हांला परमेश्वराची सेवा करवणार नाही, कारण तो पवित्र देव आहे; तो ईर्ष्यावान देव आहे; तो तुमच्या अपराधांची व पातकांची क्षमा करणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan