Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 8:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पंचमीस असे झाले की मी आपल्या घरी बसलो होतो व यहूदाचे वडील माझ्यासमोर बसले होते. तेव्हा तेथे प्रभू परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग बाबेलातील बंदिवासाच्या सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी मी माझ्या घरात बसलो असता यहूदाचे वडील माझ्या पुढे बसले होते, तेव्हा पुन्हा परमेश्वर देवाचा वरदहस्त माझ्यावर आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, जेव्हा मी माझ्या घरात बसलो होतो आणि यहूदीयाचे वडीलजन माझ्यापुढे बसले होते, तिथे सार्वभौम याहवेहचा हात माझ्यावर आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 8:1
24 Iomraidhean Croise  

अलीशा त्या वेळी आपल्या घरात बसला असून त्याच्या भोवती वडील जन बसले होते; राजाने आपल्या जवळचा एक जासूद पाठवला; तो जाऊन पोहचण्यापूर्वी अलीशा त्या वडील जनांना म्हणाला, “पाहा, ह्या खुनी मनुष्याच्या पुत्राने माझे शिर छेदण्यास मनुष्य पाठवला आहे; तर तो जासूद आला म्हणजे कवाडे लावून घेऊन त्याला लोटून द्या; त्याच्या मागोमाग त्याच्या धन्याच्या पावलांची चाहूल ऐकू येत आहे, नाही काय?”


इस्राएलाच्या वडिलांपैकी कित्येक माणसे माझ्याकडे येऊन माझ्यासमोर बसली.


ह्याकरता त्यांच्याशी बोल; त्यांना सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल घराण्यातील जो कोणी आपल्या हृदयात मूर्ती वागवतो, आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवतो आणि संदेष्ट्याकडे येतो त्याला माझे उत्तर त्याच्या मूर्तींच्या संख्येच्या मानाने मिळेल.


सातव्या वर्षी पाचव्या महिन्यात दशमीस असे झाले की इस्राएलाचे काही वडील प्रश्‍न विचारण्यासाठी येऊन माझ्यासमोर बसले.


नंतर नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दशमीस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


नंतर अकराव्या वर्षी महिन्याच्या प्रतिपदेस, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे :


दहाव्या वर्षी दहाव्या महिन्याच्या द्वादशीस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


पुन्हा सत्ताविसाव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


तेव्हा आत्म्याने मला उचलून धरले आणि माझ्यामागून त्याच्या स्थानातून, परमेश्वराच्या वैभवाचा धन्यवाद असो, असा प्रचंड वेगाचा शब्द झालेला मी ऐकला.


मग आत्म्याने मला उचलून धरले, मी आपल्या मनाच्या संतापाने क्लेश पावलो, तेव्हा परमेश्वराचा वरदहस्त जोराने माझ्यावर आला.


तेव्हा तेथे परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला व तो मला म्हणाला, “ऊठ, खोर्‍यात जा; तेथे मी तुझ्याबरोबर बोलेन.”


तेव्हा अकराव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या सप्तमीस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


अकराव्या वर्षी, तिसर्‍या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की :


बाराव्या वर्षी, बाराव्या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


बाराव्या वर्षी, महिन्याच्या पौर्णिमेस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


तो पळून आलेला मनुष्य येऊन पोहचला त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला होता; तो मनुष्य सकाळी माझ्याकडे येण्यापूर्वी देवाने माझे तोंड उघडले होते; माझे तोंड उघडल्यावर मी काही मुका नव्हतो.


लोक येतात तसे ते तुझ्याकडे येऊन माझ्या लोकांच्या रीतीप्रमाणे तुझ्यापुढे बसतात, ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत; ते तोंडाने गोडगोड गोष्टी बोलतात, पण त्यांचे मन लोभवश झाले आहे.


परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला; आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोर्‍यात नेऊन ठेवले, तेथे अस्थीच अस्थी होत्या.


आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, म्हणजे नगराचा विध्वंस झाल्यावर चौदाव्या वर्षी, वर्षारंभाच्या महिन्याच्या दशमीसच परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला व त्याने मला तेथे नेले.


राजा शोक करील, सरदार दरार्‍याने व्याप्त होईल, देशातील लोकांचे हात थरथरतील. मी त्यांच्या आचाराप्रमाणे त्यांच्याशी वर्तन करीन, त्यांच्या गुणदोषांप्रमाणे त्यांचा न्याय करीन; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”


मी पाहिले तेव्हा एक पुरुष असल्याचा भास मला झाला;1 त्याच्या कंबरेपासून खाली अग्नीचा भास झाला व त्याच्या कंबरेपासून वर तृणमण्याच्या तेजासारखा मला भास झाला.


कारण याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून नियमशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे; कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या आहे;


मी कोणाच्या सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan