Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 7:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मी तुझ्यावर कृपादृष्टी करणार नाही; मी तुझी गय करणार नाही; तर तुझ्या आचरणाचे फळ तुला देईन, तुझ्या अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर तुला मारत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मी तुम्हाकडे करुणेने बघणार नाही, आणि तुझी गय मी करणार नाही, तुझ्या कामाची परतफेड तुझ्यावर होईल. तुम्हामध्ये घृणा वास करेल मग तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे. जो शिक्षा करणारा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही; मी तुमची गय करणार नाही. मी तुम्हाला तुमच्या कृत्यांचे आणि तुमच्यातील अमंगळ कार्याचे प्रतिफळ देईन. “ ‘तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेहने तुमच्यावर वार केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 7:9
13 Iomraidhean Croise  

तथापि लोक आपले ताडन करणार्‍यांकडे फिरत नाहीत, सेनाधीश परमेश्वराला शरण जात नाहीत.


त्यांना मी एकमेकांवर आदळीन, बाप व मुले ही मी एकमेकांवर आदळीन; मी त्यांची गय करणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही, त्यांचा नाश केल्यावाचून राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.”’


परमेश्वर म्हणतो, मग यहूदाचा राजा सिद्कीया, त्याचे चाकर व त्याच्या प्रजेतले जे कोणी मरी, तलवार व दुष्काळ ह्यांतून वाचून ह्या नगरात राहतील त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, व जे त्यांचा जीव घेण्यास टपत आहेत त्यांच्या हाती देईन; तो त्यांना तलवारीने मारून टाकील; तो त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही.’


मी त्याला, त्याच्या संततीला व त्याच्या सेवकांना त्यांच्या दुष्कर्माबद्दल शिक्षा करीन आणि ते, यरुशलेमनिवासी व यहूदाचे लोक ह्यांच्यावर जे अरिष्ट आणीन म्हणून मी बोललो ते सर्व त्यांच्यावर आणीन, पण त्यांनी माझे ऐकले नाही.”’


परमेश्वराने योजल्याप्रमाणे केले आहे; त्याने प्राचीन काळापासून दिलेली ताकीद अंमलात आणली आहे; त्याने मोडतोड केली, गय केली नाही; त्याने शत्रूस तुझ्यावर हर्षवले आहे, त्याने तुझ्या वैर्‍यांचा उत्कर्ष केला आहे.


रुपे भट्टीत वितळते तसे तुम्ही यरुशलेमेत वितळून जाल, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वराने आपला संताप तुमच्यावर ओतला आहे.”


ते तुमच्या शिंदळकीचे प्रतिफळ तुम्हांला देतील; तुम्ही आपल्या मूर्तिपूजेच्या पातकांचे फळ भोगाल; तेव्हा तुम्हांला समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे.”


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू माझे पवित्रस्थान आपल्या सर्व तिरस्करणीय वस्तूंनी व अमंगळ कर्मांनी भ्रष्ट केले, म्हणून खातरीने मी तुझ्यावरची कृपादृष्टी काढून घेईन; गय करणार नाही, दया करणार नाही.


पाहा, तो दिवस! पाहा, तो येत आहे! तुझा शिक्षारूप रोपा उगवला आहे, तो फोफावून त्याचा दंड बनला आहे, तो गर्वाने फुलला आहे.


आता मी आपल्या संतप्त क्रोधाचा तुझ्यावर सत्वर वर्षाव करीन, मी आपल्या क्रोधाची परिपूर्ती तुझ्यावर करीन व तुझ्या आचरणाप्रमाणे तुझा न्याय करीन व तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन.


परमेश्वर ह्या नगरास हाक मारीत आहे; जो शहाणा आहे तो तुझे नाम ओळखतो - “तुम्ही दंडाचे व तो नेमणार्‍याचे ऐका.


फसू नका; देवाचा उपहास व्हायचा नाही; कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल.


तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांना बाहेर सोडले; आणि ‘ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे’ प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan