Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 7:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 देशातल्या रहिवाशा, तुझी घडी भरली आहे; काळ आला आहे; दिवस समीप आला आहे; डोंगरावर हर्ष नव्हे तर धुमाकूळ होणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 रहीवाशी असलेल्या लोकांच्या भूमीवर सत्यानाश येऊन ठेपला आहे, हानी जवळ येण्याचा समय आला आहे, आणि कुठल्याही पर्वतावर हर्षभरीत ध्वनी ऐकू येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तुम्ही जे देशात राहतात, त्या तुमच्यावर विनाश आला आहे. समय आला आहे! दिवस जवळ आहे! डोंगरावर आनंद नाही, तर गोंधळ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 7:7
16 Iomraidhean Croise  

पहाट होताच दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, “ऊठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या दोन मुली ह्यांना घेऊन नीघ, नाहीतर ह्या नगराच्या शिक्षेत तुझा संहार होईल.”


तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांच्यावर गंधक व अग्नी ह्यांचा वर्षाव आकाशातून केला;


रानकुत्री त्यांच्या किल्ल्यांत, कोल्ही त्यांच्या मनोरम महालात ओरडतील;तिचा काळ जवळ आला आहे; तिचे आयुर्दिन वाढवले जाणार नाहीत.


सुपीक मळ्यातला आनंद व उल्लास नाहीसा झाला; द्राक्षीच्या मळ्यात गायनाचा व हर्षाचा गजर होत नाही; द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवून कोणी द्राक्षारस काढत नाही; द्राक्षांच्या हंगामातला उत्सवशब्द मी बंद केला आहे.


संध्याकाळी पाहाल तर थरकाप; पहाट झाली नाही तर तिचा फडशा. जे आम्हांला लुटतात त्यांच्या वाट्याला हे आहे; जे आमचा अपहार करतात त्यांच्या हिश्शाला हे आहे.


कारण दृष्टान्ताच्या खोर्‍यात हा दिवस प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने गडबडीचा, पायमल्लीचा व घाबरण्याचा असा नेमलेला आहे; ह्या दिवशी भिंती मोडतील आणि डोंगरात आरोळ्यांचा प्रतिध्वनी होईल.


हे परमेश्वरा, तू मला फसवलेस आणि मी फसलो; तू माझ्याहून प्रबळ असल्यामुळे विजयी झालास; मी दिवसभर हसण्याचा विषय झालो आहे; जो तो माझा उपहास करतो.


त्याचे सर्व वीर मारून टाका; त्यांना वधस्थली जाऊ द्या; त्यांना धिक्कार असो! कारण त्यांचा दिवस, त्यांच्या समाचाराची वेळ आली आहे.


ह्याकरता त्यांना सांग : प्रभू परमेश्वर म्हणतो की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही; मी बोलेन ते वचन सिद्धीस जाईलच, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


कारण दिवस समीप आला आहे; परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे; तो अभ्रमय दिवस आहे; तो विधर्म्याचा शासनदिन आहे.


समय आला आहे, दिवस समीप आला आहे; विकत घेणारा आनंद न करो, विकणारा खेद न पावो; कारण त्या सर्व समूहावर क्रोध येत आहे.


त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.


कारण जो पर्वत निर्माण करतो, वारा उत्पन्न करतो, मनुष्याच्या मनातील विचार काय आहेत ह्याची त्याला जाणीव करून देतो, जो प्रभात अंधकारमय करतो आणि पृथ्वीच्या उच्च स्थलांवर चालतो त्याचे नाम परमेश्वर, सेनाधीश देव, हे आहे.”


कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे; आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणार्‍यांचा शेवट काय होईल?


Lean sinn:

Sanasan


Sanasan