Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 7:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मी तुझ्यावर कृपादृष्टी करणार नाही, मी गय करणार नाही; तर तुझ्या करणीचे प्रतिफळ तुला देईन; तुझ्या अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुझ्यामध्ये दिसेल तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 माझी दृष्टी तुमच्यावर दया करणार नाही, आणि मी तुमची गय करणार नाही, तुमच्या कामाचे वेतन तुम्हास देईन, तुमची घृणा मला येते, मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही; मी तुमची गय करणार नाही. मी खचितच तुमच्या कृत्यांचे आणि तुमच्यातील अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 7:4
24 Iomraidhean Croise  

त्यांना मी एकमेकांवर आदळीन, बाप व मुले ही मी एकमेकांवर आदळीन; मी त्यांची गय करणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही, त्यांचा नाश केल्यावाचून राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.”’


प्रथमत: त्यांचे दुष्कर्म व त्यांचे पाप ह्यांचे दुप्पट प्रतिफळ मी त्यांना देईन; कारण त्यांनी आपल्या प्रेतवत व अमंगळ मूर्तींनी माझा देश भ्रष्ट केला आहे. त्यांनी आपल्या किळसवाण्या वस्तूंनी माझे वतन भरले आहे.”


त्यांच्याकडूनही अनेक राष्ट्रे व थोर राजे दास्य करवून घेतील; मी त्यांच्या कृतींप्रमाणे व त्यांच्या हातच्या कर्मांप्रमाणे त्यांना प्रतिफळ देईन.


तरी ज्यांचे मन त्यांच्या तिरस्करणीय व अमंगळ वस्तूंच्या मनोरथास अनुसरते त्याच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी येईलसे मी करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


आबाद नगरे उजाड होतील, भूमी ओसाड होईल, म्हणजे तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.”


तू आपल्या तरुणपणाच्या दिवसांचे स्मरण ठेवले नाहीस, तर हे सर्व करून मला चिडवलेस, म्हणून पाहा, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझ्या अनाचाराचे प्रतिफळ मी तुझ्या माथी लादीन, म्हणजे आपल्या इतर सर्व अमंगळ कर्मांत आणखी शिंदळकीची भर तू घालणार नाहीस.


ह्यामुळे त्यांच्यावर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन; मी आपल्या कोपाग्नीने त्यांना भस्म करीन, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी आणीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


तू आपल्या बहिणीच्या मार्गाने गेलीस म्हणून मी तिच्याप्रमाणे तुझ्याही हाती पेला देईन.


ते तुमच्या शिंदळकीचे प्रतिफळ तुम्हांला देतील; तुम्ही आपल्या मूर्तिपूजेच्या पातकांचे फळ भोगाल; तेव्हा तुम्हांला समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे.”


मी परमेश्वर हे बोललो आहे; हे घडेलच, हे मी करीनच; मी मागे हटणार नाही, गय करणार नाही, ह्याचा मला अनुताप होणार नाही; तुझ्या आचारांनुसार, तुझ्या कर्मांनुसार, ते तुझा न्याय करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


त्यांनी केलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे मी देश ओसाडी व विस्मय ह्यांचा विषय करीन, तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू माझे पवित्रस्थान आपल्या सर्व तिरस्करणीय वस्तूंनी व अमंगळ कर्मांनी भ्रष्ट केले, म्हणून खातरीने मी तुझ्यावरची कृपादृष्टी काढून घेईन; गय करणार नाही, दया करणार नाही.


मी आपला हात त्यांच्यावर उगारीन आणि त्यांच्या सर्व वसतिस्थानांतील भूमी दिबलाकडच्या रानापेक्षा वैराण व ओसाड करीन; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”


तुमच्यामध्ये वध पावलेले पडतील तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


राजा शोक करील, सरदार दरार्‍याने व्याप्त होईल, देशातील लोकांचे हात थरथरतील. मी त्यांच्या आचाराप्रमाणे त्यांच्याशी वर्तन करीन, त्यांच्या गुणदोषांप्रमाणे त्यांचा न्याय करीन; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”


आता तुझा अंत आला आहे; मी आपला संताप तुझ्यावर भडकवीन, तुझ्या करणीप्रमाणे तुझा न्याय करीन व तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन.


मी तुझ्यावर कृपादृष्टी करणार नाही; मी तुझी गय करणार नाही; तर तुझ्या आचरणाचे फळ तुला देईन, तुझ्या अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर तुला मारत आहे.


ह्यामुळे मी संतापून करायचे ते करीन, मी त्यांच्यावर कृपादृष्टी करणार नाही; त्यांची गय करणार नाही; त्यांनी मोठ्याने माझ्या कानी आरोळी मारली तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”


मी तर कृपादृष्टी करणार नाही, गय करणार नाही, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्या शिरी लादीन.”


परमेश्वराचा यहूदाबरोबर वाद आहे, तो याकोबाला त्याच्या आचरणाप्रमाणे शासन करील; त्याच्या कर्माप्रमाणे तो त्याला प्रतिफळ देईल.


समाचार घेण्याचे दिवस आले आहेत; प्रतिफळाचे दिवस आले आहेत; इस्राएलास हे समजून येईल; तुझ्या पापांच्या राशीमुळे, तुझ्या अति वैरामुळे, संदेष्टा मूर्ख असा बनला आहे, आत्मसंचार झालेल्याला वेड लागले आहे.


परमेश्वर मला म्हणाला, “आमोसा, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “ओळंबा.” प्रभू म्हणाला, “पाहा, माझे लोक इस्राएल ह्यांच्यामध्ये मी ओळंबा धरतो; मी ह्यापुढे त्यांची गय करणार नाही;


मी ह्या देशाच्या रहिवाशांवर ह्यापुढे दया करणार नाही असे परमेश्वर म्हणतो; पण मी त्यांना एकमेकांच्या व राजाच्या हाती देईन; ते देश नष्ट करतील व मी त्यांना त्यांच्या हातातून सोडवणार नाही.”


कारण “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन; असे प्रभू म्हणतो.” आणखी, “परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील,” असे ज्याने म्हटले तो आपल्याला माहीत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan