Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 7:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “प्रभू परमेश्वर इस्राएल देशाला म्हणतो, हे मानवपुत्रा, अंत आला आहे, देशाचा चोहो बाजूंनी अंत आला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “मानवाच्या मुला, परमेश्वर देव इस्राएलाच्या भूमीला म्हणतो, या देशाच्या चारही बाजुचा शेवट झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “मानवपुत्रा, इस्राएल देशाला सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘अंत! देशाच्या चारही कोपर्‍यांवर शेवट आला आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 7:2
28 Iomraidhean Croise  

मग देव नोहाला म्हणाला, “सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे. पाहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन.


त्याने वेद्या मोडून टाकल्या, अशेरामूर्ती व कोरीव मूर्ती कुटून त्यांचे चूर्ण केले आणि इस्राएल देशातल्या सर्व सूर्यमूर्ती त्याने तोडूनफोडून टाकल्या आणि मग तो यरुशलेमेस परत आला.


तू म्हणालीस, “मी सर्वकाळ स्वामिनी राहीन,” म्हणून तू ह्या गोष्टी ध्यानात धरल्या नाहीत, त्यांचा परिणाम लक्षात आणला नाही.


देशाने कोठवर शोक करावा? सर्व देशातली वनस्पती कोठवर सुकणार? त्यात वस्ती करणार्‍यांच्या दुष्टतेने पशुपक्षी नष्ट झाले आहेत, कारण ते म्हणतात, “आमचा अंत तो पाहणार नाही.”


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


हे बहुत जलप्रवाहाजवळ राहणार्‍या, समृद्ध भांडारे असलेल्या, तुझा अंतसमय आला आहे, तुझ्या मिळकतीस आळा बसला आहे.


तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे; ती आपला अंतकाळ स्मरली नाही; म्हणून ती विलक्षण प्रकारे अधोगतीस गेली आहे; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे परमेश्वरा, माझी विपत्ती पाहा! वैरी तोरा मिरवत आहे.”


ते आमच्या पावलांच्या मागोमाग असतात म्हणून आम्हांला आमच्या आळ्यांत फिरवत नाही; आमचा अंत जवळ आला आहे, आमचे दिवस भरले आहेत; आमचा अंत आलाच आहे.


मी हा संदेश देत असता असे झाले की पलट्या बिन बनाया मेला; तेव्हा मी उपडा पडून मोठ्याने ओरडून म्हणालो, “अहा प्रभू परमेश्वरा, तू इस्राएली अवशेषाचा पुरा अंत करतोस काय?”


“मानवपुत्रा, ‘दिवस लांबत चालले आहेत, प्रत्येक दृष्टान्त निष्फळ होत आहे,’ ही जी म्हण इस्राएल देशात तुमच्या तोंडी पडली आहे तिचा अर्थ काय?


“मानवपुत्रा, यरुशलेमेकडे आपले तोंड कर, पवित्रस्थानाकडे आपल्या वाणीचा ओघ वाहू दे व इस्राएल देशाविरुद्ध संदेश दे;


हे जखमी झालेल्या पातक्या, इस्राएलाच्या सरदारा, तुझी घटका, तुझा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे;


मी तुझ्यातले नीतिमान व दुष्कर्मी ह्यांना छेदून टाकणार, ह्यास्तव माझी तलवार म्यानातून निघून दक्षिणोत्तर सर्व मानवजातीवर चालेल;


आणि ‘उसासा का टाकतोस?’ असे तुला कोणी विचारतील तेव्हा त्यांना सांग की, ‘ही वार्ता प्रत्ययास येत आहे म्हणून; तेव्हा सर्वांची मने खचतील, सर्वांचे हात निर्बल होतील, सर्वांचा उत्साह विरेल, सर्वांच्या गुडघ्यांचे पाणी होईल; पाहा, ती प्रत्ययास येत आहे, तिच्याप्रमाणे खास घडेल,”’ असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


तू कायमचे वैर धरलेस आणि इस्राएल लोकांवर संकट आले तेव्हा, त्यांचा पापमूलक अंतसमय आला तेव्हा, त्यांना तलवारीच्या धारेच्या हवाली केलेस;


त्याने दिव्य दृष्टान्ताच्या द्वारे मला इस्राएल देशात नेऊन एका अतिशय उंच पर्वतावर ठेवले; त्यावर दक्षिणेस नगराच्या आकारासारखे काही होते.


आणखी परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले :


आता तुझा अंत आला आहे; मी आपला संताप तुझ्यावर भडकवीन, तुझ्या करणीप्रमाणे तुझा न्याय करीन व तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन.


त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.


तुमचे उत्सव मी शोकाचे दिवस करीन, तुमची सर्व गीते विलापरूप करीन, सर्वांच्या कंबरेस गोणपाट गुंडाळीन, सर्वांची डोकी भादरून टाकीन; कोणी एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा त्या प्रसंगासारखा तो प्रसंग करीन, आणि त्याचा शेवट क्लेशमय करीन.”


तो म्हणाला, आमोसा, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “पक्‍व फळांची पाटी.” मग परमेश्वर म्हणाला, “माझे लोक इस्राएल ह्यांचा अंतसमय आला आहे; ह्यापुढे मी त्यांची गय करणार नाही.”


तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल; घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा; कारण ‘असे होणे अवश्य आहे;’ परंतु तेवढ्यात शेवट होत नाही.


मग तो म्हणाला, ‘मी त्यांच्यापासून आपले मुख लपवीन, त्यांचा अंत कसा काय होईल ते मी पाहीन; कारण ही पिढी अतिशय कुटिल आहे, ही मुले अविश्वसनीय आहेत.


सर्वांचा शेवट जवळ आला आहे; म्हणून मर्यादेने राहा, व प्रार्थना करण्यासाठी सावध असा;


आणि तो ‘पृथ्वीच्या चार कोपर्‍यांतील गोग’ व ‘मागोग’ ह्या राष्ट्रांना ठकवण्यास व त्यांना लढण्यासाठी एकत्र करण्यास बाहेर येईल; त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे.


ह्यानंतर मी चार देवदूत ‘पृथ्वीच्या चार कोनांवर’ उभे राहिलेले पाहिले, ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे ‘चार वारे’ अडवून धरत होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan