Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तू आपले तोंड व उघडा हात यरुशलेमेच्या वेढ्याच्या चित्राकडे रोखून धर व तिच्याविरुद्ध संदेश दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आपले तोंड यरूशलेमेच्या विरुध्द दिशेला कर जे चित्र रेखाटले आहेस, ज्याला वेढा पडलेला आहे, आपल्या बाहुंनी झाकु नको; आणि त्यांच्या विरुध्द भाकीत कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मग तू यरुशलेमच्या वेढ्याकडे तोंड वळव आणि उघड्या हातांनी तिच्याविरुद्ध भविष्य सांग.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 4:7
6 Iomraidhean Croise  

परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे;1 सगळ्या दिगंतांना आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे.


“मानवपुत्रा, यरुशलेमेकडे आपले तोंड कर, पवित्रस्थानाकडे आपल्या वाणीचा ओघ वाहू दे व इस्राएल देशाविरुद्ध संदेश दे;


मग तू एक लोखंडी कढई घे; ती तुझ्यामध्ये व त्या नगरीमध्ये जशी काय लोखंडी भिंत म्हणून ठेव; तू आपले तोंड तिच्याकडे कर; तिला वेढ्याच्या स्थितीत आण; तू तिला वेढा घालणारा हो. हे इस्राएल घराण्यास चिन्ह होईल.


नगराच्या वेढ्याचे दिवस संपले म्हणजे ह्या केसांचा एक तृतीयांश नगराच्या मध्यभागी अग्नीने जाळून टाक; एक तृतीयांश केस घेऊन त्यांवर चोहोकडून तलवार चालव आणि उरलेला एक तृतीयांश वार्‍यावर उडव; ह्या प्रकारे मी तलवार उपसून त्या लोकांची पाठ पुरवीन.


“मानवपुत्रा, तू आपले मुख इस्राएलाच्या पर्वतांकडे करून त्यांना उद्देशून संदेश दे.


तो आपल्या सार्‍या राज्याच्या बलासह येईल; तरी तो त्याच्याबरोबर करारमदार करील; तो त्यांना स्त्रियांची कन्या भ्रष्ट करण्यास देईल; ती त्याच्या पक्षाला टिकून राहणार नाही, ती त्याची होणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan