Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 32:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 प्रभू परमेश्वर म्हणतो, मी बहुत राष्ट्रांच्या द्वारे तुझ्यावर आपले जाळे टाकीन; ते तुला माझ्या जाळ्याने बाहेर ओढून काढतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी पुष्कळ लोकांच्या समुदायाकडून आपले जाळे तुझ्यावर पसरीन आणि ते तुला माझ्या जाळीने वर ओढून काढतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘लोकांच्या मोठ्या जमावाद्वारे माझे जाळे मी तुझ्यावर टाकेन, आणि ते तुला माझ्या जाळ्यात ओढून घेतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 32:3
8 Iomraidhean Croise  

मी काय सागर किंवा समुद्रातला राक्षस आहे म्हणून तू माझ्यावर सक्त नजर ठेवतोस?


कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही; अपायकारक जाळ्यात सापडणार्‍या माशांप्रमाणे, पाशात अडकणार्‍या पक्ष्यांप्रमाणे, मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो; त्यात ते सापडतात.


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी पुष्कळ पाग टाकणार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते त्यांना पाग टाकून पकडतील; नंतर मी पुष्कळ शिकार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते प्रत्येक डोंगरावरून, प्रत्येक टेकडीवरून व खडकांच्या कपारींतून त्यांना हुसकून काढून त्यांची शिकार करतील.


त्याने माझ्या हाडांना वरून अग्नी लावला, ती त्याने ग्रासून टाकली; त्याने माझ्या पायांसाठी पाश मांडला, त्याने मला मागे वळवले; त्याने मला उजाड, सदा कोमेजलेली असे केले आहे.


मी त्याच्यावर आपले जाळे टाकीन म्हणजे तो माझ्या पाशात सापडेल; मी त्याला बाबेलास खास्द्यांच्या देशात घेऊन जाईन; पण तो देश त्याला दिसणार नाही व तो तेथेच मरेल.


मी आपले जाळे त्याच्यावर टाकीन; तो माझ्या पाशात सापडेल; मी त्याला बाबेलास नेईन; त्याने माझ्याबरोबर केलेल्या विश्वासघातासंबंधाने तेथे मी त्याची झडती घेईन.


ते जातील तेव्हा त्यांच्यावर मी आपले जाळे टाकीन, आकाशातल्या पाखरांप्रमाणे त्यांना खाली पाडीन; त्यांच्या मंडळीने ऐकले आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिक्षा करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan