Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 27:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तिला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, “अगे सोरे, समुद्राच्या प्रवेशस्थानाजवळ वसलेले, बहुत द्वीपांच्या लोकांसाठी व्यापार चालवणारे; तू म्हणतेस, ‘मी सौंदर्याची खाण आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि “सोरेला सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तू समुद्राच्या प्रवेशाद्वाराजवळ वसली आहेस, जी तू पुष्कळ द्वीपांतील व्यापारी लोकांसाठी आहेस. सोरे! तू म्हणाली, मी सुंदरतेत परिपूर्ण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 सोरला सांग, तू जी समुद्राच्या प्रवेशद्वाराजवळ वसलेली, अनेक समुद्रतटावर लोकांशी व्यापार करणारी, ‘त्या तुझ्याविषयी सार्वभौम याहवेह म्हणतात: “ ‘अगे सोर, तू म्हणतेस, “मी सौंदर्याने परिपूर्ण आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 27:3
15 Iomraidhean Croise  

सौंदर्याचा केवळ कळस असा जो सीयोन डोंगर, त्यावरून देव प्रकाशला आहे.


गबाल, अम्मोन व अमालेक, पलेशेथ व सोरकर हे ते आहेत;


ती व्यापारी गलबतांसारखी आहे. ती आपली अन्नसामग्री दुरून आणते.


परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारला आहे; त्याने राष्ट्रांना थरथर कापवले आहे; त्याने कनानासंबंधाने अशी आज्ञा केली आहे की त्याचे दुर्ग नष्ट करावे.


तू तर आपल्या सौंदर्यावर भरवसा ठेवून आपल्या कीर्तीच्या जोरावर शिंदळकी केलीस, आल्यागेल्याबरोबर शिंदळकीचा तू सपाटा चालवलास; तुझे सौंदर्य त्यांना लुटण्यास सापडले.


ते तुझी संपत्ती लुटतील, तुझा माल लुटतील; तुझे तट उद्ध्वस्त करतील, तुझे रंगमहाल पाडून टाकतील; तुझे पाषाण, लाकूड, माती वगैरे सर्वकाही पाण्यात बुडवून टाकतील.


ते तुझ्याविषयी शोक करून म्हणतील, ‘अगे कीर्तिमान नगरी, तू जशी काय समुद्रातून उद्भवून बसली होतीस, तू समुद्रावर पराक्रमी होतीस, तू व तुझे रहिवासी ह्यांचा तेथील सर्व लोकांना वचक असे, ती तू कशी नष्ट झालीस!


तुझ्या सीमा समुद्राने वेष्टलेल्या आहेत; बांधणार्‍यांनी तुला सौंदर्यपूर्ण बनवले आहे.


कारण, ‘तिच्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस सर्व राष्ट्रे प्याली आहेत; पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ केले व पृथ्वीवरील व्यापारी तिने आपल्या विषयभोगास खर्चलेल्या द्रव्यबळाने धनवान झाले.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan