Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 26:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तो तुझ्या तटांना आपली आघातयंत्रे लावील, आपल्या हत्यारांनी तुझे बुरूज पाडून टाकील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तो तुझ्या तटाला पाडण्यासाठी आपला मोठा ओंडका ठेवील आणि आपल्या हत्यारांनी तुझे बुरुज पाडून टाकील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तो तुझ्या तटांसमोर युद्धाची यंत्रे लावेल व आपल्या हत्यारांनी तुझे बुरूज नष्ट करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 26:9
5 Iomraidhean Croise  

यरुशलेमेच्या बुरुजांवर व प्राकारांवर चतुर कारागिरांनी नव्याने शोधून काढलेली यंत्रेही बसवली; त्या यंत्रांनी बाण व मोठे धोंडे फेकून मारता येत असत. त्याची कीर्ती दूरवर पसरली; त्याला इतके विलक्षण साहाय्य मिळाले की तो महासामर्थ्यवान झाला.


त्याच्या उजव्या बाजूस यरुशलेमेविषयी शकुन निघाला; तो असा की आघातयंत्रे लावावीत, ‘मारा! हाणा!’ असे शब्द तोंडातून काढावेत; सिंहनाद करावा, वेशींना आघातयंत्रे लावावीत; मोर्चे रचावेत व बुरूज बांधावेत.


त्याचे घोडे इतके येतील की, त्यांनी उडवलेल्या धुळीने तू झाकून जाशील; तटबंदीची नगरे फोडून आत शिरतात तसे तो तुझ्या वेशीतून आत शिरेल, तेव्हा स्वार, चाके व रथ ह्यांच्या आवाजाने तुझे तट हादरतील.


ते सोरेच्या तटांचा विध्वंस करतील व तिचे बुरूज पाडून टाकतील; मी तिच्यावरील माती खरडून काढून तिचा उघडा खडक करीन.


भूप्रदेशातल्या तुझ्या कन्यांना तो तलवारीने वधील; तो तुझ्याविरुद्ध बुरूज बांधील, मोर्चा रचील व तुझ्याविरुद्ध ढालींचा कोट उभारील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan