Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 26:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी बाबेलचा राजा, राजाधिराज नबुखद्रेस्सर, ह्याला उत्तरेहून घोडे, रथ, स्वार व मोठे दळ ह्यांसह सोरेवर आणीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी उत्तरेकडून बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर, राजांचा राजा याला मी घोडे व रथ, आणि घोडदळ! पुष्कळ लोकांची फौज घेऊन सोराविरूद्ध आणत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर त्याचे घोडे व रथ, घोडेस्वार व विराट सैन्याला उत्तरेकडून सोरवर हल्ला करण्यास मी आणेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 26:7
22 Iomraidhean Croise  

“स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री एज्रा याजक ह्याला राजाधिराज अर्तहशश्त इत्यादी;


तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय?


सोर व सीदोन ह्यांचे सर्व राजे व समुद्रापलीकडील देशांचे राजे ह्यांना,


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


पाहा, ढगांप्रमाणे तो येत आहे, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत; त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्ही हायहाय करणार, आमचे वाटोळे झाले आहे!


सिंह आपल्या झाडीतून बाहेर निघाला आहे; राष्ट्रांना फस्त करणारा वाट चालत आहे, तुझा देश ओस करण्यासाठी, तुझी नगरे उजाड, निर्जन करण्यासाठी तो आपल्या स्थानातून निघाला आहे;


त्याच्याशी त्याने गोड भाषण करून बाबेलात जे राजे त्याच्या बंदीत होते त्यांच्याहून त्याला उच्च आसन दिले.


ते लोक धनुष्ये व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही, ते सागराप्रमाणे गर्जना करतात; ते घोड्यांवर स्वार झाले आहेत; हे सीयोनकन्ये, ते युद्धास सिद्ध होऊन तुझ्याविरुद्ध एकजुटीने येत आहेत.”


ह्यासाठी की ते राष्ट्र नीच व्हावे, त्याने आपले डोके वर करू नये, परंतु त्याचा करार पाळल्यानेच ते कायम राहावे.


ते शस्त्रे, रथ, चाकांची वाहने, निरनिराळ्या लोकांचा दळभार घेऊन तुझ्यावर येतील; ते कवचे, ढाली व शिरस्त्राणे धारण करून तुला चोहोंकडून घेरतील; मी न्याय करण्याचे काम त्यांना सोपवून देईन, म्हणजे ते आपल्या कायद्यांना अनुसरून न्याय करतील.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, अगे सोरे, मी तुझ्याविरुद्ध आहे, समुद्र आपल्या लाटा लोटतो त्याप्रमाणे मी तुझ्यावर बहुत राष्ट्रे लोटीन.


म्हणून पाहा, मी तुझ्यावर परकीय लोक आणतो; तुझ्यावर अन्य राष्ट्रांतले उग्र पुरुष आणतो; तुझ्या अकलेच्या सौंदर्यावर ते तलवार उपसतील व तुझे तेज भ्रष्ट करतील.


महाराज, आपण राजाधिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य, पराक्रम, बल व वैभव ही दिली आहेत;


राजाने दानिएलास म्हटले, “तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्ये प्रकट करणारा देव आहे.”


जरी ते राष्ट्रात देणग्या देत फिरतात तरी मी आता त्यांना एकत्र करीन, ते राजाधिराजाच्या कारभाराने घटत जातील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan