Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 26:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ती समुद्रात जाळी पसरण्याचे ठिकाण होईल; मी हे म्हटले आहे असे परमेश्वर म्हणतो; लूट म्हणून ती राष्ट्रांच्या हाती लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 ती समुद्रामध्ये जाळीसाठी वाळवण्याची जागा होईल. असे प्रभू परमेश्वर म्हणतो, आणि ती राष्ट्रासाठी लूट अशी होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 ती बाहेर समुद्रावर जाळे पसरण्याचे स्थान होईल, कारण मी हे बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह म्हणतात. ती राष्ट्रांसाठी लूट होईल,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 26:5
6 Iomraidhean Croise  

म्हणून पाहा, मी आपला हात तुझ्यावर उगारीन, मी तुला राष्ट्रांच्या हाती लूट म्हणून देईन, तुझा राष्ट्रांतून उच्छेद करीन, देशांमधून तुला नाहीसे करीन, तुला मी नष्ट करीन; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे.


मी तुझा उघडा खडक करून तुला जाळे पसरण्याचे ठिकाण करीन; तुला पुन्हा बांधणार नाहीत; मी परमेश्वराने हे म्हटले आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुला निर्जन झालेल्या नगरांप्रमाणे ओसाड नगरी करीन व तुझ्यावर खोल सागराचा लोट आणून प्रचंड जलप्रवाहांनी तुला व्यापून टाकीन,


ते शोकाकुल होऊन तुझ्याविषयी विलाप करून म्हणतात, ‘सोरेप्रमाणे, समुद्रात गडप झालेल्या सोरेप्रमाणे, कोणाची तरी दशा झाली आहे काय?


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला मी मिसराचा मुलूख देईन; तेव्हा तो त्यांचा समुदाय हिरावून नेईल, त्याने लुटलेले तो लुटील; त्याने हरण केलेले तो हरण करील, असा त्याच्या सैन्यास मोबदला मिळेल.


तिच्या तीरी धीवर उभे राहून एन-गेदीपासून एन-इग्लाइमापर्यंत पाग टाकतील; महासागरातल्या माशांप्रमाणे त्या नदीत भिन्नभिन्न जातींचे विपुल मासे सापडतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan