Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 26:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “मानवपुत्रा, सोर यरुशलेमेविषयी म्हणत आहे, ‘अहा! जी केवळ राष्ट्रांचे प्रवेशद्वार अशी होती ती मोडून गेली आहे आणि आता लोकप्रवाह माझ्याकडे वळला आहे; ती उजाड झाली आहे, म्हणून आता माझी भरभराट होणार आहे;’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “मानवाच्या मुला, कारण सोर यरूशलेमेविरूद्ध म्हणत आहे, अहा! लोकांचे प्रवेशद्वार तुटले आहेत! ती माझ्याकडे वळली आहे; जशी ती उजाड झाली तशी मी ओतप्रोत भरेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “मानवपुत्रा, यरुशलेमविषयी सोरने म्हटले, ‘आहा! राष्ट्रांचे प्रवेशद्वार मोडले आहे आणि त्याचे दरवाजे माझ्यासाठी उघडे पडले आहेत; ती उजाड झाली आहे, तर आता माझी भरभराट होईल,’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 26:2
27 Iomraidhean Croise  

सोरेचा राजा हीराम ह्याने दाविदाकडे जासूद पाठवले; तसेच त्याने गंधसरूचे लाकूड, सुतार व गवंडी पाठवले; त्यांनी दाविदासाठी राजमंदिर बांधले.


माझ्यापुढे तोंड विचकून ते म्हणाले, “अहाहा! अहाहा! आता आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे.”


मला “अहाहा! अहाहा!” असे चिडवणार्‍यांची फजिती होऊन त्यांची तोंडे बंद पडोत.


तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी आनंद व उल्लास पावोत; तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे “परमेश्वराचा महिमा वाढो,” असे सतत म्हणोत.


मला “अहाहा! अहाहा!” असे चिडवणार्‍यांची फजिती होऊन ते लज्जेने मागे हटोत.


गबाल, अम्मोन व अमालेक, पलेशेथ व सोरकर हे ते आहेत;


बाहेर पडा, वेशीतून बाहेर पडा; लोकांचा मार्ग नीट करा; राजमार्गाला भर घाला, घाला भर; धोंडे काढून टाका; अन्य राष्ट्रांसाठी ध्वजा उभारा.


सोर व सीदोन ह्यांचे सर्व राजे व समुद्रापलीकडील देशांचे राजे ह्यांना,


आणि ती यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याकडे यरुशलेमास जे जासूद आले आहेत त्यांच्या हस्ते अदोमाचा राजा, मवाबाचा राजा, अम्मोन्यांचा राजा, सोराचा राजा आणि सीदोनाचा राजा ह्यांच्याकडे पाठव;


पलिष्ट्यांच्या नाशाचा दिवस येत आहे; सोर व सीदोन ह्यांना साहाय्य करणारा जो कोणी उरला असेल त्याचा उच्छेद होईल; परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफतोर द्वीपांतील अवशिष्ट लोकांचा नाश करणार आहे.


अम्मोनी लोकांविषयी : परमेश्वर म्हणतो, “काय? इस्राएलास कोणी पुत्र, कोणी वारस नाही काय? तर मिलकोम दैवताने1 गाद का घेतले? त्याचे लोक गादाच्या नगरांतून का वस्ती करून आहेत?


हायहाय! लोकांनी गजबजलेली नगरी कशी एकान्तात बसली आहे! राष्ट्रांमध्ये जी थोर तिला कसे वैधव्य आले आहे! परगण्यांमध्ये जी राणी ती कशी करभार देणारी झाली आहे!


व अम्मोन वंशजांचा देश, ही पूर्वेकडील लोकांना स्वारी करण्यास खुली करून देईन; त्यांचा मी त्यांना ताबा देईन, म्हणजे मग अम्मोन वंशजांचे नाव राष्ट्रांमध्ये ह्यापुढे कोणी काढणार नाही.


कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, तू इस्राएल देशाविषयी टाळ्या पिटल्यास, थैथै नाचलास व त्याची दुर्दशा पाहून तू मनापासून द्रोहपूर्वक आनंद केलास;


प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मवाब व सेईर म्हणतात की, ‘पाहा, यहूदाचे घराणे इतर राष्ट्रांसारखेच आहे;’


नंतर अकराव्या वर्षी महिन्याच्या प्रतिपदेस, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे :


‘ही दोन राष्ट्रे, हे दोन देश माझे आहेत, आपण त्यांचा ताबा घेऊ,’ असे तेथे परमेश्वर असता तू म्हणालास,


प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्यासंबंधाने शत्रू म्हणतात, ‘अहा! ही प्राचीन उंच स्थळे आमच्या ताब्यात आली आहेत;’


सोर, सीदोन व पलेशेथाचे सर्व प्रदेशहो, तुम्ही माझे काय करणार? मी केलेल्याचा बदला घेता काय? अथवा मला काही करता काय? मी त्वरेने तुमचे कृत्य तुमच्या माथी मारीन.


तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते; तेथून ती होसाकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्रास मिळते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan