Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 26:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 ते तुझी संपत्ती लुटतील, तुझा माल लुटतील; तुझे तट उद्ध्वस्त करतील, तुझे रंगमहाल पाडून टाकतील; तुझे पाषाण, लाकूड, माती वगैरे सर्वकाही पाण्यात बुडवून टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 याप्रकारे ते तुझी शक्ती आणि व्यापारी माल लुटतील! ते तुझे तट आणि तुझी श्रीमंत घरे पाडून टाकतील तुझे दगड व लाकूड आणि तुझी माती ते पाण्यामध्ये घालतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 ते तुझी संपत्ती व व्यापारी वस्तू लुटून घेतील; ते तुझ्या भिंती फोडतील आणि तुझ्यातील सुंदर घरांचा ते नाश करतील व तुझे धोंडे, लाकूड व माती समुद्रात फेकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 26:12
19 Iomraidhean Croise  

हिज्कीयाला बहुत धन व मान मिळाला; त्याने सोने, रुपे, रत्ने, सुगंधी द्रव्ये, ढाली व नाना प्रकारची चांगली पात्रे ह्यांसाठी भांडारे बनवली.


वर्षारंभी नबुखद्नेस्सराने सैन्य पाठवून तो व त्याच्याबरोबर परमेश्वराच्या मंदिरातली मोलवान पात्रे ही बाबेलास आणली आणि त्याचा भाऊ सिद्कीया ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांवर राजा केले.


परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारला आहे; त्याने राष्ट्रांना थरथर कापवले आहे; त्याने कनानासंबंधाने अशी आज्ञा केली आहे की त्याचे दुर्ग नष्ट करावे.


सोर ही राजमुकुटदात्री; तिचे व्यापारी सरदार, तिचे उदमी जगातले महाजन; तिच्याविरुद्ध हे कोणी योजले?


रम्य शेते व फलयुक्त द्राक्षांचे वेल नाहीत म्हणून त्या ऊर बडवतील.


मेंढपाळहो, हायहाय करा, ओरडा; कळपांचे प्रमुखहो, राखेत लोळा; कारण तुमच्या वधाचे दिवस भरले आहेत, मोलवान भांडे पडून भंगते तसे तुम्ही पडाल, अशी मी तुमची दाणादाण करीन.


गारद्यांच्या नायकाबरोबर आलेल्या खास्द्यांच्या सर्व सैन्याने यरुशलेमेचे सर्व तट पाडून टाकले.


ती समुद्रात जाळी पसरण्याचे ठिकाण होईल; मी हे म्हटले आहे असे परमेश्वर म्हणतो; लूट म्हणून ती राष्ट्रांच्या हाती लागेल.


ते तुला गर्तेत उतरवतील; भर समुद्रात वध पावणार्‍यांच्या मृत्यूसारखा तुझा मृत्यू होईल.


तो त्यांची दैवते, ओतीव मूर्ती, आणि त्यांची सोन्यारुप्याची सुंदर भांडी लुटून मिसर देशात नेईल; तो उत्तरेच्या राजावर चढाई न करता काही वर्षे राहील.


तो जरी आपल्या भाऊबंदांत फलद्रूप आहे तरी पूर्वेचा वारा, रानातून परमेश्वराचा वारा येईल आणि त्याची विहीर आटेल, त्याचा झरा सुकून जाईल; तो त्याच्या निधींतील सर्व मनोरम वस्तू हरण करील.


तुम्ही गरिबाला तुडवता व भेट म्हणून त्याच्यापासून धान्य उपटता, त्यामुळे जी चिर्‍यांची घरे तुम्ही बांधली आहेत त्यांत तुम्ही राहणार नाही; तुम्ही जे द्राक्षाचे रमणीय मळे लावले आहेत त्यांचा द्राक्षारस पिणार नाही.


चांदी लुटा! सोने लुटा! सर्व तर्‍हेच्या शोभिवंत वस्तूंचा अमर्याद संग्रह आहे.


“जी राष्ट्रे त्यांच्या ओळखीची नाहीत त्यांमध्ये मी त्यांना वावटळीने उडवीन. त्यांच्यामागे त्यांचा देश उजाड झाला आहे; त्यातून कोणी जातयेत नाही; कारण त्यांनी उत्तम भूमी वैराण केली आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan