यहेज्केल 26:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्याचे घोडे इतके येतील की, त्यांनी उडवलेल्या धुळीने तू झाकून जाशील; तटबंदीची नगरे फोडून आत शिरतात तसे तो तुझ्या वेशीतून आत शिरेल, तेव्हा स्वार, चाके व रथ ह्यांच्या आवाजाने तुझे तट हादरतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 घोड्यांच्या जमावांच्या धुळीने तो तुला झाकून टाकील. जेव्हा तो हल्ला करून तटबंदीची नगरे पाडून जसे आत शिरतात तसे तो तुझ्या वेशीतून आत प्रवेश करेल, तेव्हा घोड्यांच्या आवाजाने आणि रथांच्या चाकांच्या खडखडाटाने तुझे तट थरथर कापतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्याचे घोडे इतके असतील की त्यांनी उडविलेल्या धुळीने तू झाकला जाशील. युद्धाचे घोडे, गाडे व रथासह तो जेव्हा तुझ्या द्वारातून प्रवेश करेल आणि ज्या शहराच्या भिंती कोसळल्या आहेत, त्यातून त्याचे सैन्य प्रवेश करतील तेव्हा तुझ्या भिंती त्यांच्या मोठ्या आवाजाने थरकापतील. Faic an caibideil |