Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 23:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यांनी मिसर देशात व्यभिचार केला; त्यांनी आपल्या तारुण्यात व्यभिचार केला; तेथे त्यांची स्तने मर्दण्यात आली; पुरुषांनी त्यांच्या कौमार्यावस्थेतील त्यांची स्तनाग्रे चुरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यांनी आपल्या तारुण्याच्या दिवसात मिसरात वेश्या कर्म केले. त्यांची स्तने चुरली व कुमारी असतांना त्यांच्या छातीला गोंजारण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्या इजिप्तमध्ये वेश्या होऊन, त्यांच्या तारुण्यापासून वेश्यावृत्ती करीत होत्या. त्या देशात त्यांची स्तने हाताळली गेली आणि त्यांच्या कुमारावस्थेतील छाती कुरवाळली गेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 23:3
17 Iomraidhean Croise  

तिच्या व्यभिचाराच्या स्वैरतेने देश भ्रष्ट झाला; तिने काष्ठपाषाणांशी व्यभिचार केला.


तू तर आपल्या सौंदर्यावर भरवसा ठेवून आपल्या कीर्तीच्या जोरावर शिंदळकी केलीस, आल्यागेल्याबरोबर शिंदळकीचा तू सपाटा चालवलास; तुझे सौंदर्य त्यांना लुटण्यास सापडले.


ही सर्व अमंगळ कृत्ये व शिंदळक्या करताना तू लहानपणी उघडीनागडी असून आपल्या रक्तात लोळत होतीस ह्याची तुला कधी आठवण झाली नाही.


तेव्हा मी त्यांना म्हटले, तुम्ही सर्वांनी आपल्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू फेकून द्याव्यात व मिसर देशाच्या मूर्तींनी आपणांस विटाळ होऊ देऊ नये; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


तरीपण ते माझ्याशी फितूर झाले व माझे ऐकेनात; त्यांच्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू त्यांच्यातील कोणी फेकून दिल्या नाहीत; मिसर देशाच्या मूर्तीही सोडून दिल्या नाहीत; तेव्हा मिसर देशात त्यांच्यावर माझ्या क्रोधाची वृष्टी करावी, त्यांच्यावर माझा कोप पूर्ण करावा असे मी म्हटले.


तरी तिने आपल्या तारुण्यात मिसर देशात वेश्यावृत्ती चालवली होती. तिची तिला आठवण होऊन तिने आपला व्यभिचार अधिकच वाढवला.


ह्या प्रकारे तुझ्या तारुण्यात मिसरी पुरुष तुझी कौमार्यदशेतील स्तनाग्रे चुरीत तेव्हाच्या शिंदळकीची तू आठवण केलीस.”


तू तो निथळून पिशील, त्याच्या खापर्‍या तू कुरतडून खाशील व त्यांनी तू आपले ऊर ओरबाडशील; कारण मी हे बोललो आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


त्यांतल्या थोरलीचे नाव अहला होते व तिच्या बहिणीचे नाव अहलीबा होते; त्या माझ्या झाल्या आणि त्यांना पुत्र व कन्या झाल्या. त्यांची नावे पाहिली असता अहला (तिचा डेरा) म्हणजे शोमरोन व अहलीबा (माझा डेरा तिच्या ठायी आहे) म्हणजे यरुशलेम.


तेव्हा जी शिंदळकी करून निःसत्त्व झाली होती तिच्याविषयी मी म्हणालो की, आता ते तिच्याबरोबर व ती त्यांच्याबरोबर व्यभिचार करील काय?


मिसर देशातील आपली शिंदळकी तिने सोडून दिली नाही; तेथल्या पुरुषांनी तिच्या तारुण्यात तिच्याबरोबर गमन केले, त्यांनी तिची कौमार्यावस्थेतील स्तनाग्रे चुरली व तिच्याबरोबर मनसोक्त व्यभिचार केला.


परमेश्वर होशेयाबरोबर प्रथम बोलला तेव्हा तो त्याला म्हणाला, “जा, एक जारिणी बायको करून घे व जारकर्माची मुले आपली अशी करून घे; कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जारकर्म हा देश करीत आहे.”


तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन; आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर1 खिंड देईन; ती आपल्या तारुण्याच्या दिवसांतल्याप्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणे, माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल.


आणि ह्यामुळे व्यभिचारी मतीने अजदैवतांच्या (बोकड) मागे लागून त्यांना त्यांनी आपले यज्ञपशू अर्पण करू नयेत; हा तुम्हांला पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


आपण मिसर देशात कसे राहत होतो व निरनिराळ्या राष्ट्रांमधून प्रवास करीत आपण कसे आलो हे तुम्हांला ठाऊकच आहे;


तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्त्विकतेने व खर्‍या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा.


आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर, आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळण्यात आले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan