Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 22:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तिला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, अगे नगरी, तुझा काळ येऊन ठेपावा म्हणून तू आपल्यामध्ये रक्तपात करतेस, व आपणांस विटाळण्यासाठी मूर्ती करतेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग तू म्हणावे परमेश्वर देव असे म्हणत आहे, असे दिवस येत आहेत की, या शहराच्या मध्य भागात रक्तपात करण्यात आला आहे. शहराने स्वतःला मूर्तीने अपवित्र केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे नगरी, तू रक्तपात करून व मूर्ती बनवून स्वतःला अशुद्ध करून आपला नाश ओढवून घेतला आहेस,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 22:3
22 Iomraidhean Croise  

यहूदी लोकांना आपल्यासमोरून घालवावे म्हणून नि:संशय हे सर्व परमेश्वराच्या आज्ञेने यहूदावर आले; मनश्शेने केलेल्या सर्व पापकर्मांमुळे व त्याने निरपराध जनांचा रक्तपात केल्यामुळे असे झाले.


त्याने यरुशलेम निरपराध जनांच्या रक्ताने भरून टाकले म्हणून परमेश्वर क्षमा करीना.


ते आपल्या कृत्यांनी भ्रष्ट झाले; ते आपल्या कृतींनी अनाचारी बनले.


साध्वी नगरी कशी असाध्वी झाली आहे? ती न्यायपूर्ण होती, तिच्यात नीतिमत्ता वसत असे, आता तिच्यात घातकी राहतात.


कारण मी परमेश्वर आहे; मी बोलत आहे व मी बोलतो ते वचन सिद्धीस जाईलच, त्याला इतःपर विलंब लागणार नाही; कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, हे फितुरी घराण्या, मी तुमच्या दिवसांत वचन बोलेन व ते पूर्ण करीन.”


“मानवपुत्रा, तू न्याय करशील ना? त्या खुनी नगरीचा न्याय करशील ना? त्या वेळी तिला तिची सर्व अमंगळ कृत्ये दाखव.


तिच्यातले सरदार भक्ष्य फाडून खाणार्‍या लांडग्यांसारखे आहेत; ते अन्यायाने कमाई करण्यासाठी रक्तपात करतात, मानवी प्राण्यांचा विनाश करतात.


स्वत: पाडलेल्या रक्ताने तू आपणास दोषी केलेस, तू केलेल्या मूर्तींनी आपणास विटाळवलेस, तू आपला काळ समीप आणलास, तुझी वर्षे भरली आहेत; म्हणून मी तुला राष्ट्रांच्या निंदेस, सर्व देशांच्या थट्टेस पात्र करीन.


पाहा, इस्राएलाचे सर्व सरदार आपापल्या बाहुबलाप्रमाणे रक्तपात करण्यास तुझ्यात राहिले आहेत.


कारण त्यांनी व्यभिचार केला आहे, त्यांच्या हातांना रक्त लागले आहे, त्यांनी आपल्या मूर्तींबरोबर व्यभिचार केला आहे आणि माझ्यापासून त्यांना झालेले पुत्र मूर्तींना भक्ष्य व्हावे म्हणून त्यांनी अग्नीत त्यांचे होम केले आहेत.


तथापि नीतिमान लोक जारिणींचा व खुनी स्त्रियांचा न्याय करतात तसा त्यांचा करतील; कारण त्या जारिणी आहेत व त्यांच्या हातांना रक्त लागले आहे.”


ते सगळे निवडक अश्शूरी पुरुष असून त्यांच्याबरोबर ती शिंदळकी करू लागली आणि ज्या सर्वांवर ती आसक्त झाली त्यांच्या सर्व मूर्तींनी ती भ्रष्ट झाली.


ह्यास्तव त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो की : तुम्ही रक्तासहित मांस खाता, आपल्या मूर्तींकडे डोळे लावता आणि रक्तपात करता; असे जे तुम्ही त्या तुम्हांला ह्या देशाचे वतन मिळेल काय?


तेव्हा तो मला म्हणाला, “इस्राएल व यहूदा ह्यांच्या घराण्याचा अधर्म अत्यंत भारी आहे; देश रक्तपाताने भरला आहे; कारण ते म्हणतात, ‘परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे, परमेश्वर पाहत नाही.’


तुम्ही रक्तपात करून सीयोन व दुष्टाई करून यरुशलेम बांधता.


तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत, तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत, ते सकाळपर्यंत काही शिल्लक राहू देत नाहीत.


की, आपल्या हटवादीपणाने पश्‍चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?


ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील; त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan