Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 21:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 इस्राएल देशास सांग, परमेश्वर असे म्हणतो की पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे, मी आपली तलवार म्यानातून उपसून तुझ्यातले नीतिमान व दुष्कर्मी ह्यांना छेदून टाकीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 इस्राएलाच्या भूमिला सांग, परमेश्वर देव म्हणतो; पाहा! मी तुझ्या विरुध्द आहे, मी शेथापासून आपली तलवार म्यानातून उपसून घेऊन तुझ्यापासून धर्मिकाला आणि दुर्जनाला वेगळे करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि इस्राएलाच्या भूमीला सांग: ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्याविरुद्ध आहे. माझ्या म्यानातून मी माझी तलवार उपसून नीतिमान आणि दुष्ट अशा दोघांनाही तुझ्यातून छेदून टाकेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 21:3
37 Iomraidhean Croise  

हे कसेही असो, एकूण एकच; म्हणून मी म्हणतो, देव निर्दोष्याचा तसाच दुष्टाचाही नाश करतो.


हे परमेश्वरा, ऊठ, त्याच्याशी सामना कर, त्याला चीत कर; आपल्या तलवारीने दुर्जनांपासून माझा जीव सोडव.


तुझ्या उजव्या हाताकडे असलेल्या पुरुषावर, तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो;


त्याप्रमाणे तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर व आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड.


शत्रू म्हणाला, मी पाठलाग करीन, मी गाठीन, मी लूट वाटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल; मी तलवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करीन.


जे काही घडते ते सर्वांना सारखेच घडते; नीतिमान व दुष्ट, सात्त्विक, शुद्ध व अशुद्ध, यज्ञ करणारा व यज्ञ न करणारा ह्या सर्वांची एकच गती होते; सात्त्विकाची व पाप्याची, शपथ वाहणार्‍याची, तशीच शपथ वाहण्यास भिणार्‍याची सारखीच दशा होते.


जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातातील सोटा माझा कहर आहे त्या अश्शूरास धिक्कार असो.


कारण माझ्या तलवारीस आकाशात उन्माद चढला आहे; पाहा, शासन करण्यासाठी अदोमावर, ज्या लोकांचा सर्वस्वी नाश करण्याचे मी योजले आहे त्यांच्यावर ती उतरेल.


नीतिमान नष्ट होतो, पण ते कोणी लक्षात घेत नाही; देवभक्त प्राणास मुकतात, पण अरिष्टामुळे नीतिमान प्राणास मुकतो हा विचार कोणी करत नाही.


पण तुम्ही शब्बाथ पवित्रपणे पाळावा, शब्बाथ दिवशी ओझे वाहू नये व यरुशलेमेच्या वेशींतून येजा करू नये, ही माझी आज्ञा तुम्ही ऐकणार नाही तर त्याच्या वेशींत मी अग्नी पेटवीन; तो यरुशलेमेचे वाडे जाळून खाक करील, तो विझणार नाही.”’


“परमेश्वर म्हणतो, अगे खोर्‍यातील व पठारावरील रहिवासिनी, पाहा, जे तुम्ही म्हणता की, ‘आमच्यावर कोण चढाई करून येईल, आमच्या वस्तीत येण्याची कोणाची छाती आहे?’ त्या तुमच्याविरुद्ध मी उभा आहे.


परमेश्वर म्हणतो, तुमच्या करणीच्या फळाप्रमाणे मी तुमचा समाचार घेईन; तिच्या वनात मी अग्नी पेटवीन, तो तिच्या आसपासचे सगळे भस्म करील.”


हे गर्विष्ठा! पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो; कारण तुझा दिवस, मी तुझा समाचार घेण्याची वेळ आली आहे.


तू माझा परशू आहेस, तू माझी युद्धशस्त्रे आहेस; तुझ्या द्वारे मी राष्ट्रे मोडून त्यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे राज्ये नष्ट करीन.


हे सर्व पृथ्वीचा नाश करणार्‍या विध्वंसगिरी, पाहा, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्याविरुद्ध आहे; मी आपला हात तुझ्यावर उगारीन, तुझा कडेलोट करीन, जळून कोळ झालेल्या पर्वतासमान मी तुला करीन.


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, “तुम्ही पोकळ गोष्टी सांगता व खोटे दृष्टान्त पाहता; तर पाहा, मी तुमचा विरोध करीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


मी देशावर तलवार आणून म्हटले की, अगे तलवारी, देशावर फीर आणि तिने मनुष्य व पशू ह्यांचा संहार केला;


तर मग मी तलवार, दुष्काळ, हिंस्र पशू व मरी ही माझी चार्‍ही उग्र शासने यरुशलेमेतील मनुष्य व पशू ह्यांचा संहार करण्यास त्यावर पाठवीन, तेव्हा त्याचा निभाव कसा लागेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


“मानवपुत्रा, बाबेलच्या राजाची तलवार येण्याकरता दोन रस्ते आखून काढ; ते दोन्ही रस्ते एकाच देशातून निघावेत; नगरात जाणार्‍या रस्त्याच्या चवाठ्यावर मार्गदर्शक हाताची एक आकृती खोदून काढ.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या खुनी नगरीला धिक्कार असो! मी सरपणाचा ढीगही मोठा करीन.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, अगे सोरे, मी तुझ्याविरुद्ध आहे, समुद्र आपल्या लाटा लोटतो त्याप्रमाणे मी तुझ्यावर बहुत राष्ट्रे लोटीन.


तर पाहा, मी तुझ्या नद्यांवर उठेन; मी मिग्दोलापासून सवेनेपर्यंत, कूशाच्या सीमेपर्यंत, मिसर देश ओसाड व उजाड करीन.


तुझ्या वस्तीचा तिसरा हिस्सा पटकीने मरेल व तुझ्यामध्ये लोक उपासमारीने नाश पावतील; तिसरा हिस्सा तुझ्याभोवती तलवारीने पडेल; व तिसरा हिस्सा मी सर्व दिशांना विखरीन; मी तलवारीने त्यांची पाठ पुरवीन.


त्या अर्थी प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी, मीच तुझ्या विरुद्ध होईन आणि राष्ट्रांदेखत तुझ्यामध्ये न्यायशासन करीन.


मी तुमच्यावर तलवार आणीन, ती करार मोडल्याचा बदला घेईल; तुम्ही आपापल्या नगरात जमा व्हाल, तेव्हा मी तुमच्यावर मरी पाठवीन; मी तुम्हांला तुमच्या शत्रूच्या स्वाधीन करीन.


परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन; तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील.


परमेश्वरास शरण जा, म्हणजे वाचाल; नाहीतर तो योसेफाच्या घराण्यावर अग्नीसारखा पडून त्याला खाऊन टाकील; त्याला विझवणारा बेथेलात कोणी असणार नाही.


प्रभू परमेश्वराने मला दाखवले तेव्हा पाहा, शासन करण्यास त्याने अग्नीला बोलावले, तेव्हा त्याने महासागर खाऊन टाकला व भूमीही तो खाऊन टाकणार होता.


पाहा, मी तुझ्यावर चालून येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी तिचे रथ जाळीन, त्यांचा धूर निघेल, तुझ्या तरुण सिंहांना तलवार नष्ट करील; मी पृथ्वीवरून तुझे भक्ष्य नाहीसे करीन, तुझ्या जासुदांचा शब्द ह्यापुढे ऐकू येणार नाही.


पाहा, मी तुझ्यावर चालून येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी तुझे नेसण तुझ्या तोंडावर उडवून देईन; राष्ट्रांना तुझी नग्नता दाखवीन, राज्यांना तुझी लाज दाखवीन.


अहो कूशाच्या रहिवाशांनो, तुम्हीही माझ्या तलवारीने मराल.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याच्यावर ऊठ; मेंढपाळावर प्रहार कर म्हणजे मेंढरे विखरतील; माझ्या लहानग्यांवर मी माझ्या हाताची छाया करीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan