Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 21:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “मानवपुत्रा, यरुशलेमेकडे आपले तोंड कर, पवित्रस्थानाकडे आपल्या वाणीचा ओघ वाहू दे व इस्राएल देशाविरुद्ध संदेश दे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मानवाच्या मुला आपले तोंड यरूशलेमेकडे कर आणि पवित्र ठिकाणा विषयी इस्राएलाच्या भूमी विरुध्द भविष्यवाणी कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “मानवपुत्रा, यरुशलेमविरुद्ध आपले तोंड कर आणि पवित्रस्थानाविरुद्ध संदेश दे. इस्राएल देशाविरुद्ध भविष्यवाणी कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 21:2
21 Iomraidhean Croise  

माझे बोलणे संपल्यावर ते पुन्हा बोलत नसत; माझे भाषण त्यांना पर्जन्यवृष्टीसारखे होई.


तू आपल्या सेवकांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास मी आपल्या बहुत रथांनिशी पर्वतांच्या माथ्यावर, लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे; मी त्याचे उंच गंधसरू व निवडक देवदारू तोडून टाकीन; त्याच्या अत्यंत दूरच्या उच्च स्थानी त्याच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन.


म्हणून त्यांच्याविरुद्ध संदेश दे, मानवपुत्रा, संदेश दे.”


“मानवपुत्रा, दक्षिणेकडे आपले तोंड कर, दक्षिणेकडे आपल्या वाणीचा ओघ वाहू दे आणि दक्षिणेच्या मैदानांतील वनाविषयी संदेश दे.


परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या खुनी नगरीला धिक्कार असो! मी सरपणाचा ढीगही मोठा करीन.


“मानवपुत्रा, अम्मोन वंशजांकडे आपले मुख करून त्यांच्याविषयी संदेश दे;


“मानवपुत्रा, सीदोनेकडे आपले मुख फिरवून तिच्याविरुद्ध संदेश दे;


“मानवपुत्रा, मिसर देशाचा राजा फारो ह्याच्याकडे आपले तोंड करून त्याच्याविरुद्ध व सर्व मिसर देशाविरुद्ध संदेश दे.


हे मानवपुत्रा, इस्राएलाच्या पर्वतांना संदेश देऊन सांग की, इस्राएलाच्या पर्वतांनो, परमेश्वराचे वचन ऐका.


“मानवपुत्रा, मागोग देशातील गोग, जो रोश, मेशेख व तुबाल ह्यांचा अधिपती, त्याच्याकडे आपले मुख करून त्याच्याविरुद्ध संदेश दे;


मग तू एक लोखंडी कढई घे; ती तुझ्यामध्ये व त्या नगरीमध्ये जशी काय लोखंडी भिंत म्हणून ठेव; तू आपले तोंड तिच्याकडे कर; तिला वेढ्याच्या स्थितीत आण; तू तिला वेढा घालणारा हो. हे इस्राएल घराण्यास चिन्ह होईल.


तू आपले तोंड व उघडा हात यरुशलेमेच्या वेढ्याच्या चित्राकडे रोखून धर व तिच्याविरुद्ध संदेश दे.


“मानवपुत्रा, तू आपले मुख इस्राएलाच्या पर्वतांकडे करून त्यांना उद्देशून संदेश दे.


तर परमेश्वराचे वचन ऐक; तू म्हणतोस ‘इस्राएलाविरुद्ध संदेश सांगू नकोस, इसहाकाच्या घराण्याविरुद्ध शब्द काढू नकोस.”’


वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, “द्राक्षारस व मद्य ह्यांचे मी भाकीत करीन,” तर तो ह्या लोकांचा संदेष्टा होईल.


“संदेश सांगू नका” असे ते लोकांना म्हणतात, “ह्या गोष्टींविषयी संदेश सांगू नये; अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.”


माझ्यासाठीही विनवणी करा की, ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे तिचे रहस्य उघडपणे कळवण्या-साठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावेत, ह्यासाठी की, जसे बोलायला हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे.


पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी होवो, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिबको; कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम, हिरवळीवर जशा पावसाच्या सरी, तसे ते वर्षो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan