Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 20:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 “मानवपुत्रा, इस्राएलाच्या वडिलांबरोबर बोल; त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही मला प्रश्‍न विचारण्यास आलात काय? प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुम्हांला मला प्रश्‍न विचारू देणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मानवाच्या मुला इस्राएलाच्या वडीलांना जाहीर करून सांग की प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, तुम्ही मला प्रश्न विचारायला आला काय? प्रभू परमेश्वर देव म्हणतो, माझ्या जीवीताची शपथ मी तुला प्रश्न विचारु देणार नाही, असे परमेश्वर देव जाहीर करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “मानवपुत्रा, इस्राएलाच्या वडिलांशी बोल आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्याकडून विचारपूस करण्यास तुम्ही आला आहात काय? माझ्या जिवाची शपथ, मी तुम्हाला माझ्याकडे विचारपूस करू देणार नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 20:3
20 Iomraidhean Croise  

दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते.


दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते; त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून आणले तर मग ते किती अधिक वीट आणणारे असणार?


नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थनादेखील वीट आणणारी आहे.


तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडवता, हे तुम्हांला सांगितले कोणी?


तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत.


ते तर रोजरोज माझ्याकडे येतात, माझे मार्ग ते जाणू इच्छितात; नीतीचे आचरण करणार्‍या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणार्‍या राष्ट्राप्रमाणे ते माझ्याजवळ रास्त निर्णय मागतात; देवाची समीपता ते इच्छितात.


इस्राएलाच्या वडिलांपैकी कित्येक माणसे माझ्याकडे येऊन माझ्यासमोर बसली.


तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


आणि आपली अर्पणे वाहून व आपल्या पुत्रांचा अग्नीत होम करून आपल्या सर्व मूर्तींच्या योगे आजवर आपणांस विटाळवत आहात; असे असता मी तुम्हांला मला प्रश्‍न विचारू देईन काय? प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुम्हांला मला प्रश्‍न विचारू देणार नाहीच.


हे मानवपुत्रा, तुझे बांधव भिंतींजवळ, दरवाजांजवळ तुझ्याविषयी बोलत आहेत; एक दुसर्‍याला, भाऊ भावाला म्हणतो, ‘चला, परमेश्वराकडून काय वचन आले ते ऐकू या.’


ते ह्या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील, उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पडतझडत जातील; ते परमेश्वराचे वचन प्राप्त करून घेण्यासाठी इकडून तिकडे धावतील तरी त्यांना ते प्राप्त व्हायचे नाही.


द्रष्टे लज्जित होतील, दैवज्ञ फजीत होतील; ते सर्व आपली दाढी झाकतील कारण देवाकडून काही उत्तर मिळणार नाही.


परंतु परूशी व सदूकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांना म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हांला कोणी सावध केले?


तेव्हा जे लोकसमुदाय त्याच्या हातून बाप्तिस्मा घेण्यास त्याच्याकडे निघून येत असत त्यांना तो म्हणत असे, “अहो सापाच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळायला तुम्हांला कोणी सावध केले?


देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”


शौलाने परमेश्वराला प्रश्‍न विचारले असता परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan