Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ते तुझे ऐकोत न ऐकोत, निदान त्यांच्याकडे कोणीतरी संदेष्टा गेला होता ते त्यांना समजेल; ती तर बोलूनचालून फितुरी जात आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 ते तुझे ऐकतील किंवा ऐकणार नाही, ते फितुर झालेले आहेत. परंतू संदेष्टा त्यांच्याकडे आला होता असे त्यांना कदाचित कळून येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 ते ऐको किंवा न ऐकोत—कारण ते बंडखोर लोक आहेत—त्यांना कळेल की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 2:5
20 Iomraidhean Croise  

इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली हे देवाचा माणूस अलीशा ह्याने ऐकले, तेव्हा त्याने राजाला सांगून पाठवले, “तू आपली वस्त्रे का फाडलीस? त्याने माझ्याकडे यावे, म्हणजे इस्राएलात संदेष्टा आहे हे त्याला कळेल.”


तेव्हा राजाने तो पट आणण्यास यहूदी ह्याला पाठवले; त्याने तो अलीशामा लेखकाच्या दिवाणखान्यातून आणला. तो यहूदीने राजाला व राजाभोवती उभे राहणार्‍या सर्व सरदारांना वाचून दाखवला.


अहो यहूदाचे अवशिष्ट लोकहो, परमेश्वराने तुम्हांला सांगितले आहे की, ‘मिसर देशात जाऊ नका, मी तुम्हांला आज बजावून सांगत आहे हे पक्के लक्षात ठेवा.’


“मानवपुत्रा, ‘तू काय करतोस’ असे तुला त्या इस्राएल घराण्याने, त्या फितुरी घराण्याने म्हटले ना?


“ह्या बंडखोर घराण्याला सांग, ह्या गोष्टी काय आहेत हे तुम्हांला समजत नाही काय? त्यांना सांग की, पाहा, बाबेलच्या राजाने यरुशलेमेस येऊन तिचा राजा व तिचे सरदार ह्यांना धरले व आपणाकडे बाबेल येथे आणवले.


ते ऐकोत न ऐकोत, तू माझी वचने त्यांना साग; ते तर अत्यंत फितुरी आहेत.


ह्या फितुरी घराण्यास दाखला देऊन असे म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो, एक कढई चुलीवर चढव; ती चढवल्यावर तिच्यात पाणी ओत.


तू त्या पातक्यास बजावले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्ग ही सोडली नाहीत, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल.


तुझी जीभ तुझ्या टाळूस चिकटेल असे मी करीन, म्हणजे तू मुका होशील आणि तू त्यांचा निषेधकर्ता होणार नाहीस; कारण ते फितुरी घराणे आहे.


तरीपण मी तुझ्याबरोबर बोलेन, तेव्हा मी तुझे तोंड उघडीन, मग तू त्यांना सांग की, ‘प्रभू परमेश्वर म्हणतो’; ज्याला ऐकायचे असेल तो ऐको, ज्याला ऐकायचे नसेल, तो न ऐको; ते तर फितुरी घराणे आहे.


तरीपण हे घडून येईल, (पाहा, ते आता घडत आहे,) तेव्हा आपल्यात एक संदेष्टा होता, असे त्यांना समजून येईल.”


त्या दुर्जनाने आपल्या मार्गावरून मागे फिरावे म्हणून तू त्याला सावध केले असताही तो आपल्या मार्गावरून मागे न फिरल्यास तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण तू आपल्या जिवाचा बचाव करशील.


त्या फितुरी इस्राएल घराण्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल वंशजहो, तुम्ही ही सगळी अमंगळ कृत्ये केली तेवढी पुरे;


मी आलो नसतो व त्यांच्याबरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते; परंतु आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही.


तेव्हा पौल व बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगण्याचे अगत्य होते; तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता त्या अर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो.


कित्येकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan