Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 हे त्यांचे वंशज उद्धट व कठीण हृदयाचे आहेत; मी तुला त्यांच्याकडे पाठवत आहे. ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो’ हे त्यांना सांग.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्यांच्या पूर्व पिढीचे लोक हट्टी आणि कठीण मनाचे होते, मी तुला त्यांच्या जवळ पाठवत आहे. आणि हे परमेश्वर देव त्यांच्याशी बोलत आहे. असे त्यांना तू सांग.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ज्या लोकांकडे मी तुला पाठवित आहे ते उद्धट व हट्टी आहेत. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 2:4
23 Iomraidhean Croise  

मीखाया म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वर जे काही मला सांगेल तेच मी बोलेन.”


तुम्ही आपल्या पूर्वजांप्रमाणे ताठ मानेचे होऊ नका, तर परमेश्वराला शरण जा आणि जे पवित्रस्थान त्याने कायमचे पवित्र केले आहे, त्याच्याजवळ या व तुमचा देव परमेश्वर ह्याची उपासना करून त्याच्या भडकलेल्या कोपाचे निवारण करा.


नबुखद्नेस्सर राजाने त्याला देवाची शपथ वाहायला लावली होती; त्याच्याविरुद्धही त्याने बंड केले; त्याने आपली मान ताठ केली, आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे तो वळला नाही, त्याने आपले मन कठीण केले.


मरीबा येथल्याप्रमाणे, रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका;


दुर्जन आपला हट्ट आपल्या मुखचर्येवर व्यक्त करतो, पण सरळ मनुष्य आपल्या वर्तनक्रमाचा विचार करतो.


तू हट्टी आहेस, तुझ्या मानेचे स्नायू जसे काय लोखंड व तुझे कपाळ जसे काय पितळ आहे हे मला ठाऊक होते.


मग परमेश्वर मला म्हणाला, “मी बाळ आहे असे म्हणू नकोस; ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल.


ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही; तरी तुझे कपाळ पडले कसबिणीचे; तुला लाज कशी ती ठाऊक नाही.


तेव्हा राजाने तो पट आणण्यास यहूदी ह्याला पाठवले; त्याने तो अलीशामा लेखकाच्या दिवाणखान्यातून आणला. तो यहूदीने राजाला व राजाभोवती उभे राहणार्‍या सर्व सरदारांना वाचून दाखवला.


हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? तू त्यांना ताडन करतोस तरी ते दु:खित होत नाहीत; तू त्यांना क्षीण करतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत, ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करतात, ते वळत नाहीत.


त्यांनी अमंगल कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना लाज मुळीच वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील,” असे परमेश्वर म्हणतो.


त्यांनी अमंगळ कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना बिलकूल लाज वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो.


जा, पकडून नेलेल्या तुझ्या लोकांच्या वंशजांकडे जाऊन त्यांच्याशी बोल; त्यांना सांग की प्रभू परमेश्वर असे म्हणतो; मग ते तुझे ऐकोत किंवा न ऐकोत.”


तरीपण मी तुझ्याबरोबर बोलेन, तेव्हा मी तुझे तोंड उघडीन, मग तू त्यांना सांग की, ‘प्रभू परमेश्वर म्हणतो’; ज्याला ऐकायचे असेल तो ऐको, ज्याला ऐकायचे नसेल, तो न ऐको; ते तर फितुरी घराणे आहे.


मग तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, जा, इस्राएल घराण्याकडे जा आणि त्यांच्याजवळ माझी वचने बोल.


पण इस्राएल घराणे तुझे ऐकणार नाही, कारण माझे ते ऐकणार नाहीत; इस्राएलाचे सगळे घराणे कठीण कपाळाचे व कठीण हृदयाचे आहे.


मी कळपांमागे असता परमेश्वराने मला निवडले; परमेश्वर मला म्हणाला, ‘जा, माझे लोक इस्राएल ह्यांना संदेश सांग.’


पूर्वीच्या संदेष्ट्यांच्या द्वारे सेनाधीश परमेश्वराने आपल्या आत्म्याच्या द्वारे पाठवलेले नियमशास्त्र व वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपले मन पाषाणासारखे कठीण केले; ह्यास्तव सेनाधीश परमेश्वराचा त्यांच्यावर मोठा कोप झाला.


पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.


म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुंता करा आणि ह्यापुढे ताठ मानेचे राहू नका.


कारण तुमचा बंडखोरपणा आणि तुमच्या मानेचा ताठा मी जाणून आहे; पाहा, मी अजून तुमच्याबरोबर जिवंत असतानाही तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करीत आला आहात, तर मी मेल्यावर कितीतरी कराल!


Lean sinn:

Sanasan


Sanasan