Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू आपल्या पायांवर उभा राहा, म्हणजे मी तुझ्याबरोबर बोलेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 ती वाणी मला म्हणाली; “मानवाच्या मुला, आपल्या पायांवर उभा राहा; मग मी तुझ्याशी बोलेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, तुझ्या पायांवर उभा राहा, म्हणजे मी तुझ्याशी बोलेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 2:1
32 Iomraidhean Croise  

मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे?


पावसाच्या दिवशी मेघांत दिसणार्‍या धनुष्याप्रमाणे त्यांच्याभोवती प्रभा फाकलेली मला दिसली; परमेश्वराच्या तेजाचे हे दर्शन होते. मी ते पाहून उपडा पडलो व कोणा बोलणार्‍याची वाणी माझ्या कानी आली.


ह्याकरता हे मानवपुत्रा, तू देशांतर करण्यास लागणारी सामग्री सिद्ध कर, व भरदिवसा त्यांच्यादेखत निघून जा; त्यांच्यादेखत आपले ठिकाण सोडून दुसर्‍या ठिकाणी जा; न जाणो हे कदाचित त्यांच्या लक्षात येईल; ते तर बंडखोर घराण्यातले आहेत.


“मानवपुत्रा, संदेश देणार्‍या इस्राएलाच्या संदेष्ट्यांविरुद्ध संदेश दे; जे आपल्या मनचाच संदेश देतात त्यांना सांग, ‘परमेश्वराचे वचन ऐका!’


“मानवपुत्रा, एखाद्या देशाने विश्वासघात करून माझ्याविरुद्ध पातक केल्यास मी त्यावर आपला हात चालवीन, त्याच्या अन्नाचा आधार तोडीन, देशात दुष्काळ पाडीन, आणि त्यातून मनुष्य व पशू ह्यांचा उच्छेद करीन;


“मानवपुत्रा, ह्या मनुष्यांनी आपल्या हृदयांत आपल्या मूर्ती वागवल्या आहेत; त्यांनी आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवले आहे; अशा लोकांना मी आपल्याला प्रश्‍न विचारू देईन काय?


“मानवपुत्रा, सर्व वृक्षांत द्राक्षलतेची काय श्रेष्ठता आहे? वनवृक्षांमध्ये जी द्राक्षांची फांदी होती ती काय अधिक आहे?


“मानवपुत्रा, यरुशलेमेची अमंगळ कृत्ये तिच्या लक्षात आणून दे.


“मानवपुत्रा, इस्राएल घराण्यास कोडे घाल, हा दृष्टान्त कथन कर;


तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, मी तुला इस्राएल वंशजांकडे, माझ्याशी फितुरी केलेल्या त्या फितूर राष्ट्राकडे पाठवतो. त्यांनी व त्यांच्या वाडवडिलांनी आजपर्यंत माझ्याविरुद्ध वर्तन केले आहे.


हे मानवपुत्रा, तुझ्याभोवती काटेझुडपे व काटे असले, तू विंचवांमध्ये असलास तरी त्यांना भिऊ नकोस, त्यांच्या शब्दांना भिऊ नकोस; ही फितुरी जात आहे तरी त्यांच्या शब्दांना भिऊ नकोस; त्यांच्या चर्येस भिऊ नकोस.


हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक; त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नकोस; आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा.”


“मानवपुत्रा, इस्राएलाच्या वडिलांबरोबर बोल; त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही मला प्रश्‍न विचारण्यास आलात काय? प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुम्हांला मला प्रश्‍न विचारू देणार नाही.


तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आले आहे ते सेवन कर; हा पट सेवन कर व जाऊन इस्राएल घराण्याबरोबर बोल.”


आणखी तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, जी सर्व वचने मी तुला सांगतो ती आपल्या हृदयात साठव, ती कानाने ऐक.


“मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना बजावून सांग.


मग तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, जा, इस्राएल घराण्याकडे जा आणि त्यांच्याजवळ माझी वचने बोल.


मग तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय?” मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक.”


हे मानवपुत्रा, एक वीट घेऊन आपल्यासमोर मांड; तिच्यावर यरुशलेम नगरीचे चित्र काढ.


तो पुरुष मला म्हणाला, “मानवपुत्रा, आपल्या डोळ्यांनी पाहा, आपल्या कानांनी ऐक, व मी तुला जे काही दाखवतो त्या सर्वांकडे चित्त लाव; हे तुला दाखवावे म्हणून मी तुला इकडे आणले आहे; तू जे पाहशील ते सर्व इस्राएल घराण्यास सांग.”


तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या वेदीवर होमार्पण करावे व रक्त शिंपडावे म्हणून ती बांधून काढतील. त्यानंतरच्या दिवसांचे तिच्यासंबंधीचे विधी हे :


“हे मानवपुत्रा, तू एक तीक्ष्ण तलवार घे; ती न्हाव्याच्या वस्तर्‍याप्रमाणे वापरून आपल्या डोक्यावर व दाढीवर चालव. मग तराजू घे आणि केस तोलून त्यांची वाटणी कर.


“प्रभू परमेश्वर इस्राएल देशाला म्हणतो, हे मानवपुत्रा, अंत आला आहे, देशाचा चोहो बाजूंनी अंत आला आहे.


तो मला म्हणाला, “हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे; नीट उभा राहा; कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे;” तो माझ्याबरोबर असे बोलला तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो.


तो म्हणाला, “परमप्रिय मानवा, भिऊ नकोस; तुला शांती असो, हिंमत धर, नेट धर.” तो माझ्याबरोबर बोलला तेव्हा मला शक्ती आली व मी म्हणालो, “माझ्या स्वामी, तू आता बोलावे, कारण तू माझ्यात हिंमत आणली आहेस.”


तेव्हा मी उभा होतो तेथे तो माझ्याजवळ आला; तो आला तेव्हा मी घाबरून पालथा पडलो; तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, हा दृष्टान्त समजून घे; कारण हा शेवटच्या काळाविषयीचा आहे.”


तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, “उठा, भिऊ नका.”


स्वर्गातून उतरलेला [व स्वर्गात असलेला] जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही.


देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.


तर ऊठ व आपल्या पायांवर उभा राहा; कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की, तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक व साक्षी असे तुला नेमावे.


तेव्हा तो थरथर कापत व आश्‍चर्यचकित होऊन म्हणाला “प्रभो, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” प्रभू म्हणाला,] “तर ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan