Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 17:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, मोठाल्या पंखांचा, लांब पिसार्‍यांचा व चित्रविचित्र पिसांनी युक्त असा एक मोठा गरुड लबानोन पर्वतावर आला; त्याने गंधसरूची शेंड्याकडील एक डाहळी तोडून घेतली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 सांग की परमेश्वर देव तुम्हास सांगत आहे, एक मोठा गरुड मोठ्या पंखासह आणि लांब दातेरी चाकासह व पिसाऱ्याने परिपूर्ण आणि ते बहुरंगी आहेत ते लबानोन पर्वतावर गेला व त्यांने गंधसरुची फांदी मोडून टाकली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्यांना म्हण, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्याचे पंख शक्तिशाली आहेत, लांब पिसांचा व निरनिराळ्या रंगाचा पिसारा असलेला एक गरुड लबानोनमध्ये आला व त्याने गंधसरूच्या टोकावरील फांदी पकडली,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 17:3
20 Iomraidhean Croise  

यहोयाकीम ह्याचा पुत्र यकोन्या जो यहूदाचा राजा त्याला व यहूदाचे सरदार, कारागीर व लोहार ह्यांना नबुखद्रेस्सराने धरून यरुशलेमेतून बाबेलास नेल्यानंतर परमेश्वराने मला हे दाखवले; पाहा, परमेश्वराने मंदिरासमोर अंजिराच्या दोन टोपल्या ठेवल्या होत्या.


पाहा, ढगांप्रमाणे तो येत आहे, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत; त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्ही हायहाय करणार, आमचे वाटोळे झाले आहे!


परमेश्वर म्हणतो, “पाहा, तो गरुडासारखा उडेल व मवाबावर आपले पंख पसरील.


जी तू कड्याच्या कपारीत राहतेस, टेकडीच्या माथ्याचा आश्रय करून बसतेस, त्या तुला तुझ्या विक्राळपणाने, तुझ्या मनाच्या गर्वाने फसवले आहे; तू आपले कोटे गरुडाप्रमाणे उंच ठिकाणी केले असले तरी तेथून मी तुला खाली आणीन, असे परमेश्वर म्हणतो.


आमचा छळ करणारे आकाशातील गरुडांपेक्षा चपल होते; त्यांनी डोंगरावर आमची पाठ पुरवली, रानात आमच्यासाठी दबा धरला.


त्याने त्यांतली अगदी वरची डाहळी तोडून व्यापार्‍यांच्या1 देशात नेली व सौदागरांच्या एका शहरात लावली.


दुसरा एक मोठा गरुड होता, त्याला फार पिसे होती व मोठाले पंख होते; पाहा, त्याने लावलेल्या वाफ्यांतून आपणास पाणी मिळावे म्हणून त्या द्राक्षवेलीने आपली मुळे त्याकडे वाकवली व आपल्या फांद्या त्याकडे झुकवल्या.


पाहा, अश्शूर हा लबानोनाचा एक गंधसरू असून त्याला सुंदर फांद्या फुटल्या, त्याची छाया गर्द झाली, तो उंच वाढून त्याचा शेंडा मेघमंडळास जाऊन भिडला.


आणि जेथे जेथे मनुष्यजातीचा निवास आहे तेथील वनपशू व अंतराळातील पक्षी त्याने आपल्या अधीन केले आहेत, त्या सर्वांवर आपणास सत्ता चालवण्यास दिली आहे; सुवर्णाचे शीर आपणच आहात.


महाराज, तो वृक्ष आपणच आहात; आपण वाढून बलवान झाला आहात; आपली थोरवी वाढून गगनापर्यंत पोहचली आहे.


पहिले सिंहासारखे असून त्याला गरुडाचे पंख होते; मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवरून उचलण्यात आले; त्याला मानवाप्रमाणे दोन पायांवर उभे केले; त्याला मानवाचे हृदय दिले.


मुखाला कर्णा लाव. गरुडासारखा तो परमेश्वराच्या मंदिरावर उतरेल, कारण त्यांनी माझा करार मोडला आहे, माझ्या नियमशास्त्राचे त्यांनी अतिक्रमण केले आहे.


त्यांचे घोडे चित्त्यांहून वेगवान आहेत व संध्याकाळी बाहेर पडणार्‍या लांडग्यांपेक्षा क्रूर आहेत; त्यांचे घोडेस्वार दौड करतात, त्यांचे घोडेस्वार दुरून येतात, खाऊन टाकण्यास त्वरा करणार्‍या गरुडासारखे ते धावतात.


जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.


आणि त्याची कीर्ती सूरिया देशभर पसरली; तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा ह्यांनी पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले, आणि त्याने त्यांना बरे केले.


दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र परमेश्वर तुझ्यावर आणील; त्याची भाषा तुला समजणार नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan