Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 16:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 असे म्हण, प्रभू परमेश्वर यरुशलेमेस म्हणतो, तुझे मूळ व उत्पत्ती ही कनान देशातली आहेत; तुझा बाप अमोरी व तुझी आई हित्तीण होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 असे जाहीर कर परमेश्वर देव यरूशलेमेला असे म्हणतो, तुझी सुरुवात आणि जन्म सुध्दा कनान देशात झाला आहे, तुझा बाप आमोरी आणि आई हित्ती होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि म्हण, ‘सार्वभौम याहवेह यरुशलेमास असे म्हणतात: तुझे पूर्वज व तुझा जन्म कनानी लोकांच्या देशातील आहे; तुझा पिता अमोरी आणि तुझी आई हिथी होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 16:3
24 Iomraidhean Croise  

तेरह झाल्यावर नाहोर एकशे एकोणीस वर्षें जगला, आणि त्याला मुलगे व मुली झाल्या.


अब्राम व नाहोर ह्यांनी बायका केल्या; अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोराच्या बायकोचे नाव मिल्का; मिल्का ही हारानाची कन्या; हा हारान मिल्का व इस्का ह्यांचा बाप.


तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नाही.


परमेश्वराने इस्राएलापुढून देशातून घालवून दिलेल्या अमोरी लोकांप्रमाणे त्याने मूर्तींच्या नादी लागून पुष्कळ अमंगळ कर्मे केली.)


“यहूदाचा राजा मनश्शे ह्याने ही अमंगळ कृत्ये केली आहेत; पूर्वीच्या अमोरी लोकांपेक्षाही अधिक दुष्कर्म केले आहे आणि आपण मूर्तींच्या नादी लागून यहूदालाही पाप करायला लावले आहे;


ह्या सर्व गोष्टी झाल्यावर सरदार माझ्याकडे येऊन म्हणू लागले, “इस्राएल लोक, याजक व लेवी हे देशोदेशींच्या लोकांपासून निराळे राहत नाहीत; ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मवाबी, मिसरी व अमोरी ह्यांच्याप्रमाणेच अमंगळ कृत्ये करतात.


हे परमेश्वरा, तूच देव आहेस; तू अब्रामास निवडून घेऊन खास्द्यांच्या ऊर गावातून बाहेर आणले व त्याला अब्राहाम हे नाव दिले.


सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका; गमोर्‍याच्या लोकांनो, आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे कान द्या.


तुझ्या मूळ पुरुषाने पातक केले, तुझे मध्यस्थ माझ्याशी फितुरी करीत आले आहेत.


“मानवपुत्रा, यरुशलेमेची अमंगळ कृत्ये तिच्या लक्षात आणून दे.


तुझ्या जन्माविषयी म्हटले तर तू जन्मलीस तेव्हा तुझी नाळ कापली नाही, तुला पाण्याने धुऊन स्वच्छ केले नाही, तुझ्या अंगाला मीठ चोपडले नाही व तुला बाळंत्यात गुंडाळले नाही.


आपल्या नवर्‍याचा व मुलांचा धिक्कार करणारी तुझी माता तिची तू कन्या; आपल्या नवर्‍याचा व मुलांचा धिक्कार करणार्‍या तुझ्या बहिणी त्यांची तू बहीण; तुझी आई पडली हित्तीण व बाप पडला अमोरी.


ती पुन्हा म्यानात घाल. जेथे तू निर्माण झालास त्या तुझ्या जन्मभूमीवर मी तुझा न्याय करीन.


पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सदोमास तुझ्यापेक्षा सोपे जाईल.”


परंतु परूशी व सदूकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांना म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हांला कोणी सावध केले?


तेव्हा जे लोकसमुदाय त्याच्या हातून बाप्तिस्मा घेण्यास त्याच्याकडे निघून येत असत त्यांना तो म्हणत असे, “अहो सापाच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळायला तुम्हांला कोणी सावध केले?


तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.


त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.


तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांचा समूळ नाश कर.


जो देश वतन करून घेण्यासाठी तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेईल आणि तुमच्यापेक्षा मोठी आणि समर्थ अशी पुष्कळ राष्ट्रे म्हणजे हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ही सात राष्ट्रे तुमच्यासमोरून घालवून देईल;


ह्यांखेरीज दक्षिणेकडले अव्वी, अफेक व अमोर्‍यांच्या सरहद्दीपर्यंतचा कनान्यांचा सर्व देश व सीदोन्यांचा मारा नावाचा देश;


तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्त्विकतेने व खर्‍या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा.


ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan