Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 प्रभू परमेश्वर म्हणतो, जे मूर्ख संदेष्टे दृष्टान्त पाहिल्यावाचून आपल्याच मनातील संदेश देतात ते हायहाय करोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 प्रभू परमेश्वर असे म्हणतो; मूर्ख संदेष्ट्यांबद्दल दिलगीरी आहे. जे आपल्या स्वतःच्या आत्म्याचे अनुसरण करतात, पण आपले दर्शन बघत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मूर्ख संदेष्टे ज्यांनी काहीही पाहिले नाही तरी स्वतःच्याच आत्म्याचे अनुसरण करतात त्यांचा धिक्कार असो!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 13:3
21 Iomraidhean Croise  

बुद्धिमानाचे मन ज्ञानाचा शोध करते; मूर्खाचे मुख मूर्खता भक्षते;


सुज्ञाची जिव्हा सुज्ञान वदते; मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते.


“जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या मेंढरांचा नाश करतात व त्यांना विखरतात ते हायहाय करतील!” असे परमेश्वर म्हणतो.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्हांला संदेश देणार्‍या संदेष्ट्यांची वचने ऐकू नका, ते तुम्हांला फसवतात; ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टान्त सांगतात, परमेश्वराच्या मुखातला सांगत नाहीत.


संदेष्ट्यांविषयी : माझे हृदय माझ्या ठायी भग्न झाले आहे; माझी सर्व हाडे थरथर कापत आहेत; परमेश्वर व त्याची पवित्र वचने ह्यांमुळे मी मद्यप्यासारखा, द्राक्षारसाने मस्त झालेल्या मनुष्यासारखा झालो आहे.


मग यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्याला म्हणाला : “हनन्या, आता हे ऐक; परमेश्वराने तुला पाठवले नाही; तू ह्या लोकांना लबाडीवर भरवसा ठेवायला लावलेस.


तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टान्त पाहिला; तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही; तर त्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टान्त पाहिले.


त्यांना सांग : प्रभू परमेश्वर म्हणतो, लोकांच्या प्राणांची पारध करावी म्हणून ज्या तुम्ही प्रत्येक कोपराला पट्ट्या शिवून लावता, व निरनिराळ्या उंचीच्या मनुष्यांच्या डोक्यांसाठी जाळ्या तयार करता, त्या तुम्ही हायहाय म्हणाल. तुम्ही माझ्या लोकांच्या प्राणांची पारध करता, पण स्वतःच्या प्राणांचा बचाव करता.


हे इस्राएला, तुझे संदेष्टे ओसाड जागी असलेल्या कोल्ह्यांसारखे झाले आहेत.


“मानवपुत्रा, इस्राएलाच्या मेंढपाळांविरुद्ध तू संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो : जे इस्राएलाचे मेंढपाळ आपणच चरतात त्यांना धिक्कार असो! मेंढपाळांनी कळपाला चारावे की नाही?


समाचार घेण्याचे दिवस आले आहेत; प्रतिफळाचे दिवस आले आहेत; इस्राएलास हे समजून येईल; तुझ्या पापांच्या राशीमुळे, तुझ्या अति वैरामुळे, संदेष्टा मूर्ख असा बनला आहे, आत्मसंचार झालेल्याला वेड लागले आहे.


परमेश्वर मला म्हणाला, “जाऊन पुन्हा एखाद्या मूर्ख मेंढपाळाची आउते घे.


अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग केला, त्याने अंतर्भागही केला नाही काय?


तुम्हा शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेलात; तुम्ही स्वतः आत गेला नाहीत व जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.”


जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरवण्याचे कारण नाही; कारण मला ती सांगणे भाग आहे; कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!


तर तो गर्वाने फुगलेला आहे; त्याला काही कळत नाही, तो वादविवाद व शब्दयुद्ध ह्यांमुळे वेडा बनला आहे; ह्यांपासून1 हेवा, कलह, अपशब्द, दुसर्‍यांविषयीचे दुष्ट संशय उत्पन्न होतात;


तरी हे अधिक सरसावणार नाहीत; कारण जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले, तसे ह्यांचेही सर्वांना उघड होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan