Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 12:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ह्याकरता हे मानवपुत्रा, तू देशांतर करण्यास लागणारी सामग्री सिद्ध कर, व भरदिवसा त्यांच्यादेखत निघून जा; त्यांच्यादेखत आपले ठिकाण सोडून दुसर्‍या ठिकाणी जा; न जाणो हे कदाचित त्यांच्या लक्षात येईल; ते तर बंडखोर घराण्यातले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तथापि मानवाच्या मुला तुझ्यासाठी सर्व काही हद्दपार करण्याची तयारी कर, आणि त्यांच्या डोळ्यांदेखत बाहेर निघून जा, मी तुला तुझ्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणावर हद्दपार करीन. कदाचित त्यांना कळून येईल ते फितुर घराण्यातले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “म्हणून, हे मानवपुत्रा, निर्वासित होऊन जाण्यास तू आपले सामान बांध आणि दिवसाच्या प्रकाशात ते तुला पाहत असताच तू जिथे आहेस तिथून नीघ आणि दुसर्‍या ठिकाणाकडे जा. जरी ते बंडखोर लोक आहेत, तरी कदाचित ते समजतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 12:3
24 Iomraidhean Croise  

माझे लोक माझे ऐकतील, इस्राएल माझ्या मार्गांनी चालेल, तर बरे होईल!


हे वेढ्यात सापडलेले, तू आपले गाठोडे गुंडाळून ह्या भूमीवरून नीघ.


न जाणो ते कदाचित ऐकतील व त्यांतला प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून फिरेल, म्हणजे मग त्याच्या कृतीच्या दुष्टतेमुळे त्यांच्यावर जे अनिष्ट आणण्याचे मी योजले आहे त्याविषयी मला अनुताप होईल.


परमेश्वर मला म्हणाला, “तू आपणासाठी बंधने व जू तयार करून आपल्या मानेवर ठेव.


न जाणो यहूदाच्या घराण्यावर जे सर्व अरिष्ट आणण्याचा माझा बेत आहे ते ऐकून ते सर्व आपापल्या कुमार्गापासून वळतील आणि मी त्यांच्या दुष्कर्माची व त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करीन.”


कदाचित ते परमेश्वरापुढे आपली विनंती सादर करतील व आपापल्या कुमार्गापासून वळतील; कारण परमेश्वराने ह्या लोकांवर क्रोध व संताप करीन म्हणून सांगितले तो भारी आहे.”


पण त्यांनी माझे ऐकले नाही, आपला कान दिला नाही, त्यांनी आपली मान ताठ केली व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक वाईट केले.


मला आज्ञा झाली तसे मी केले; देशांतरास लागणारी सामग्री नेतात तसे मी भरदिवसा आपले सामानसुमान बाहेर काढले व संध्याकाळी मी तटास आरपार भोक पाडले; अंधार पडला तेव्हा मी सामान बाहेर नेले व त्यांच्यादेखत ते मी खांद्यावर घेतले.


तुझी जीभ तुझ्या टाळूस चिकटेल असे मी करीन, म्हणजे तू मुका होशील आणि तू त्यांचा निषेधकर्ता होणार नाहीस; कारण ते फितुरी घराणे आहे.


तरीपण मी तुझ्याबरोबर बोलेन, तेव्हा मी तुझे तोंड उघडीन, मग तू त्यांना सांग की, ‘प्रभू परमेश्वर म्हणतो’; ज्याला ऐकायचे असेल तो ऐको, ज्याला ऐकायचे नसेल, तो न ऐको; ते तर फितुरी घराणे आहे.


त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा ह्यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे ह्यात मला संतोष आहे; फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा; इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता?


त्यांनी केलेल्या सर्व कृत्यांबद्दल ते लज्जित झाले म्हणजे त्यांना ह्या मंदिराचा आकार, त्याची रचना, त्यात जाण्यायेण्याचे मार्ग, त्यातील सर्व आकृती, त्याचे सर्व विधी व त्याचे सर्व नियम त्यांना दाखव व त्यांच्यासमोर लिहून ठेव म्हणजे त्याच्या सर्व नियमांचे व विधींचे अवलंबन करून त्याप्रमाणे ते वागतील.


यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलाबाळांना एकत्र करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!


तेव्हा द्राक्षमळ्याचा धनी म्हणाला, ‘आता मी काय करू? मी आपल्या प्रिय पुत्राला पाठवतो, कदाचित त्याला पाहून ते त्याचा मान राखतील.’


ते शहाणे असते, त्यांना हे समजले असते, व आपल्या अंतकाळाचा विचार त्यांनी केला असता तर किती बरे झाले असते!


त्यांचे मन नेहमी असेच राहिले म्हणजे त्यांनी माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल! तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल.


विरोध करणार्‍यांना सौम्यतेने शिक्षण देणारा, असे असावे; कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्‍चात्तापबुद्धी देईल,


Lean sinn:

Sanasan


Sanasan