Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 12:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “मानवपुत्रा, तू फितुरी घराण्यात राहत आहेस, त्यांना डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही; कारण ते फितुरी घराण्यातले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “मानवाच्या मुला, तू या बंडखोर घराण्याच्या लोकात राहतो, जेथे त्यांच्याकडे बघण्याचे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत, आणि त्यांच्याकडे कान आहेत पण ते ऐकू शकत नाही, कारण ते बंडखोर घराणे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “हे मानवपुत्रा, तू बंडखोर लोकांमध्ये राहत आहेस. पाहण्यासाठी त्यांना डोळे आहेत परंतु ते पाहत नाहीत, ऐकण्यासाठी त्यांना कान आहेत परंतु ते ऐकत नाहीत, कारण ते बंडखोर लोक आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 12:2
46 Iomraidhean Croise  

इतके असूनही ते ऐकेनात; तर त्यांच्या पूर्वजांनी आपला देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास न ठेवता मान ताठ केली त्याप्रमाणे त्यांनी केले.


आणि त्यांनी त्याचे नियम, त्यांच्या वाडवडिलांशी केलेला त्याचा करार व त्यांना पढवलेले त्याचे निर्बंध ह्यांचा त्यांनी अव्हेर केला. ते भ्रामक गोष्टींच्या मागे लागून भ्रांत झाले आणि ज्या आसपासच्या परराष्ट्रांप्रमाणे करू नका असे परमेश्वराने त्यांना बजावले होते त्यांचे त्यांनी अनुकरण केले.


कितीतरी वेळा त्यांनी रानात त्याच्याविरुद्ध बंडाळी केली! कितीतरी वेळा त्यांनी अरण्यात त्याला दुःख दिले!


तुझे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत; त्यांतील प्रत्येकाला लाचांची आवड आहे. प्रत्येक जण नजराण्यांमागे लागणारा आहे; ते अनाथाचा न्याय करत नाहीत, विधवेची दाद घेत नाहीत.


परमेश्वर म्हणतो, “फितुरी मुले हायहाय करतील; ती मसलती करतात पण त्या माझ्या प्रेरणेने करीत नाहीत; ती करारमदार करतात पण माझ्या आत्म्याला अनुसरून करीत नाहीत; अशी ती पापाने पाप वाढवतात;


कारण हे बंडखोर लोक आहेत, ही लबाड मुले आहेत; ज्यांना परमेश्वराचे नियमशास्त्र ऐकायला नको अशी ही मुले आहेत.


डोळे असून आंधळे, कान असून बहिरे अशा लोकांना घेऊन या!


अशांना कळत नाही, समजत नाही; त्यांचे डोळे लिंपले असल्यामुळे त्यांना दिसत नाही; त्यांची हृदये लिंपली असल्यामुळे त्यांना समजत नाही.


तेव्हा मी म्हणालो, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले!”


जो चांगला नाही अशा मार्गाने स्वच्छंदपणे चालणार्‍या फितुरी लोकांपुढे मी आपले हात नित्य केले;


शेत राखणार्‍यांसारखे त्यांनी तिला चोहोकडून घेरले आहे, कारण तिने माझ्याशी फितुरी केली आहे, असे परमेश्वर म्हणतो.


“मूर्ख, बुद्धिहीन लोकहो, हे आता ऐका; तुम्हांला डोळे असून दिसत नाही. तुम्हांला कान असून ऐकू येत नाही.


तरी ह्या लोकांचे हृदय हट्टी व फितुरी आहे; ते फितून निघून गेले आहेत.


पण त्यांनी माझे ऐकले नाही, आपला कान दिला नाही, त्यांनी आपली मान ताठ केली व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक वाईट केले.


परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


कारण मी परमेश्वर आहे; मी बोलत आहे व मी बोलतो ते वचन सिद्धीस जाईलच, त्याला इतःपर विलंब लागणार नाही; कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, हे फितुरी घराण्या, मी तुमच्या दिवसांत वचन बोलेन व ते पूर्ण करीन.”


“ह्या बंडखोर घराण्याला सांग, ह्या गोष्टी काय आहेत हे तुम्हांला समजत नाही काय? त्यांना सांग की, पाहा, बाबेलच्या राजाने यरुशलेमेस येऊन तिचा राजा व तिचे सरदार ह्यांना धरले व आपणाकडे बाबेल येथे आणवले.


तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, मी तुला इस्राएल वंशजांकडे, माझ्याशी फितुरी केलेल्या त्या फितूर राष्ट्राकडे पाठवतो. त्यांनी व त्यांच्या वाडवडिलांनी आजपर्यंत माझ्याविरुद्ध वर्तन केले आहे.


ह्या फितुरी घराण्यास दाखला देऊन असे म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो, एक कढई चुलीवर चढव; ती चढवल्यावर तिच्यात पाणी ओत.


मी तुझे डोके गारगोटीपेक्षा वज्रप्राय कठीण करतो; त्यांना तू भिऊ नकोस, त्यांच्या कटाक्षांनी कापू नकोस; ती तर फितुरी जात आहे.”


त्या फितुरी इस्राएल घराण्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल वंशजहो, तुम्ही ही सगळी अमंगळ कृत्ये केली तेवढी पुरे;


ह्यासाठी की, त्यांनी पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यांना कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये.”


तो म्हणाला, “देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याची देणगी तुम्हांला दिली आहे; परंतु इतरांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत; अशासाठी की, ‘त्यांना दिसत असता त्यांनी पाहू नये व ऐकत असता त्यांना समजू नये.’


“त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये. म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.”


परंतु त्यांची मने कठीण झाली; कारण जुना करार वाचून दाखवण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते; ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते.


त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंत:करणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत;


म्हणजे तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलेली महान संकटे, चिन्हे व मोठे चमत्कार;


पण आजपर्यंत परमेश्वराने तुम्हांला समजायला मन, पाहायला डोळे व ऐकायला कान दिले नाहीत.


कारण तुमचा बंडखोरपणा आणि तुमच्या मानेचा ताठा मी जाणून आहे; पाहा, मी अजून तुमच्याबरोबर जिवंत असतानाही तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करीत आला आहात, तर मी मेल्यावर कितीतरी कराल!


तुमचा माझा परिचय झाला त्या दिवसापासून तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडच करीत आला आहात.


रानात तू आपला देव परमेश्वर ह्याला संतापवलेस त्याची आठवण ठेव, विसरू नकोस; मिसर देशातून तुम्ही बाहेर निघालात तेव्हापासून ह्या ठिकाणी येऊन पोहचेपर्यंत तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडच करीत आला आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan