Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, अधर्माची योजना करणारे व ह्या नगरात अनिष्ट संकल्प करणारे पुरुष ते हेच;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वर देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, हे लोक पापाची योजना करणारे आहेत, आणि हे शहरात दुष्ट योजना योजीतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेहने मला म्हटले, “मानवपुत्रा, हे ते पुरुष आहेत जे दुष्टतेचा कट करून शहरात वाईट सल्ला देतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 11:2
12 Iomraidhean Croise  

मग एस्तेरने पुन्हा राजाचे आर्जव केले; ती त्याच्या पाया पडली आणि रडून त्याची मोठी काकळूत करून तिने म्हटले, “यहूद्यांचा नायनाट करण्याविषयी हामान अगागी ह्याने केलेली अनर्थावह योजना रद्द करण्यात यावी.”


तो अंथरुणावर पडल्यापडल्या अनीतीच्या योजना करतो; तो कुमार्ग धरून राहतो, वाइटाचा वीट मानत नाही.


हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहचले आहे; तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे


अरे कपट करणार्‍या, तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्‍यासारखी अनर्थाची योजना करते.


परमेश्वर म्हणतो, “फितुरी मुले हायहाय करतील; ती मसलती करतात पण त्या माझ्या प्रेरणेने करीत नाहीत; ती करारमदार करतात पण माझ्या आत्म्याला अनुसरून करीत नाहीत; अशी ती पापाने पाप वाढवतात;


न्यायाला अनुसरून दावा करणारा कोणी नाही, आणि सत्यास स्मरून खटला चालवणारा कोणी नाही; लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवतात, कपटाने बोलतात; ते उपद्रवरूप गर्भ धारण करतात आणि अनर्थाला जन्म देतात.


तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण यिर्मयाविरुद्ध मनसुबा करू. कारण याजकाचे नियमशास्त्रज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेष्ट्यांचे वचन ही नाहीशी होणार नाहीत. चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू, त्याच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार नाही.”


ह्याकरता मी महाजनांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाचे नियम ठाऊक आहेत.” पण त्यांनी तर जोखड साफ मोडले आहे व बंधने तोडून टाकली आहेत.


नाशावर नाश येईल, अवईवर अवई उठेल; ते संदेष्ट्यांना दृष्टान्त पाहायला सांगतील, पण याजकांचे नियमशास्त्रज्ञान व वडिलांचे मसलत देण्याचे सामर्थ्य ही नष्ट होतील.


परमेश्वराविरुद्ध दुष्ट संकल्प करणारा व अनिष्ट योजणारा असा एक तुझ्यातून निघाला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan