Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 11:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग आत्म्याने मला उचलून घेऊन परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वाभिमुख पूर्वेकडील द्वाराकडे आणले; तेव्हा पाहा, वेशीपुढे पंचवीस इसम होते; त्यांच्यामध्ये याजन्या बिन अज्जूर व पलट्या बिन बनाया हे लोकनायक माझ्या दृष्टीस पडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 नंतर परमेश्वर देवाच्या घराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे देवाच्या आत्म्याने मला उचलून नेले. आणि पहा! प्रवेशद्वाराजवळ मी पंचवीस माणसे उभी असलेली पाहिली. त्यांच्यामध्ये अज्जूरचा मुलगा याजन्या आणि पलट्या मुलगा बनाया, हे लोकांचे पुढारी त्यांच्यामध्ये होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 नंतर आत्म्याने मला उचलून याहवेहच्या मंदिराच्या पूर्वेकडील द्वाराजवळ आणले. तिथे द्वाराच्या प्रवेशाकडे पंचवीस पुरुष होते आणि त्यांच्यामध्ये लोकांचे पुढारी अज्जूरचा पुत्र याजन्याह व बेनाइयाहचा पुत्र पेलातियाह यांना मी पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 11:1
23 Iomraidhean Croise  

मी आपल्याकडून जाताच मला कळणार नाही अशा ठिकाणी परमेश्वराचा आत्मा आपणाला घेऊन जाईल; आणि मी जाऊन अहाबाला हे वर्तमान सांगितले व आपण त्याला आढळला नाहीत तर तो मला मारून टाकील. मी आपला दास तर बाळपणापासून परमेश्वराला भिऊन वागत आलो आहे.


ते त्याला म्हणाले, “ऐका, आपल्या सेवकांजवळ पन्नास बळकट पुरुष आहेत; त्यांना आपल्या स्वामीचा शोध करण्यास जाऊ द्या; परमेश्वराच्या आत्म्याने त्याला उचलून एखाद्या पर्वतावर अथवा एखाद्या खोर्‍यात टाकले असेल.” तो म्हणाला, “कोणालाही पाठवू नका.”


बाबेलच्या राजाने गदल्यास सुभेदार नेमले हे सेनानायकांनी व त्याच्या लोकांनी ऐकले, तेव्हा इश्माएल बिन नथन्या, योहानान बिन कारेह, सराया बिन तान्हुमेथ, नटोफाथी आणि याजन्या बिन माकाथी व त्यांचे सर्व पुरुष मिस्पा येथे गदल्या ह्याच्याकडे आले.


सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका; गमोर्‍याच्या लोकांनो, आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे कान द्या.


तुझे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत; त्यांतील प्रत्येकाला लाचांची आवड आहे. प्रत्येक जण नजराण्यांमागे लागणारा आहे; ते अनाथाचा न्याय करत नाहीत, विधवेची दाद घेत नाहीत.


निघतेवेळी करूबांनी आपले पंख उचलले व ते माझ्यादेखत भूमीवरून वर चढून गेले; त्यांच्याबरोबर चाकेही गेली; ते परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वद्वारापुढे थांबले; त्यांच्यावर इस्राएलाच्या देवाचे तेज होते.


त्यांच्या चेहर्‍यांविषयी म्हणाल, तर खबार नदीच्या तीरी मी पाहिलेल्या चेहर्‍यांसारखेच ते होते; त्यांची स्वरूपे व ते स्वतः तसेच होते; ते नीट आपल्यासमोर चालत.


मी हा संदेश देत असता असे झाले की पलट्या बिन बनाया मेला; तेव्हा मी उपडा पडून मोठ्याने ओरडून म्हणालो, “अहा प्रभू परमेश्वरा, तू इस्राएली अवशेषाचा पुरा अंत करतोस काय?”


तेव्हा त्या आत्म्याने दृष्टान्तात मला उचलून घेऊन खास्दी देशात धरून आणलेल्या लोकांकडे आणले आणि जो दृष्टान्त मी पाहत होतो तो माझ्या डोळ्यांआड झाला.


तिच्यातले सरदार भक्ष्य फाडून खाणार्‍या लांडग्यांसारखे आहेत; ते अन्यायाने कमाई करण्यासाठी रक्तपात करतात, मानवी प्राण्यांचा विनाश करतात.


तेव्हा आत्म्याने मला उचलून धरले आणि माझ्यामागून त्याच्या स्थानातून, परमेश्वराच्या वैभवाचा धन्यवाद असो, असा प्रचंड वेगाचा शब्द झालेला मी ऐकला.


मग आत्म्याने मला उचलून धरले, मी आपल्या मनाच्या संतापाने क्लेश पावलो, तेव्हा परमेश्वराचा वरदहस्त जोराने माझ्यावर आला.


परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला; आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोर्‍यात नेऊन ठेवले, तेथे अस्थीच अस्थी होत्या.


तो पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे जाऊन पायर्‍या चढून वर गेला; त्याने द्वाराचा उंबरठा एक काठी रुंद मापला; हा पहिला उंबरठा एक काठी भरला.


नंतर त्याने मला मंदिराच्या गाभार्‍यात नेले; त्याने तेथले खांब मापले तेव्हा त्यांची रुंदी एका बाजूस सहा हात व दुसर्‍या बाजूस सहा हात भरली; ह्या गाभार्‍याची रुंदी मंडपाच्या रुंदीइतकी होती.


तेव्हा त्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या आतल्या अंगणात नेले, तो पाहा, परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारी देवडीच्या व वेदीच्या दरम्यान सुमारे पंचवीस इसम परमेश्वराच्या मंदिराकडे पाठ करून व पूर्वेकडे तोंड करून उभे होते; ते पूर्व दिशेस सूर्याची उपासना करीत होते.


त्याने हाताच्या आकृतीचे काही पुढे करून माझ्या डोक्यावरील एक बट धरली आणि आत्म्याने आकाश व पृथ्वी ह्यांच्या दरम्यान मला उचलून नेऊन दिव्यदृष्टीने यरुशलेम येथे उत्तरेस असलेल्या आतल्या अंगणाच्या दरवाजाजवळ आणले; तेथे ईर्ष्येस पेटवणार्‍या मूर्तीचे आसन होते.


यहूदाचे सरदार शेताची मेर सारणार्‍यांसारखे झाले आहेत; मी त्यांच्यावर पाण्याप्रमाणे आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन.


मग ते पाण्यातून वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलिप्पाला घेऊन गेला म्हणून तो पुन्हा षंढाच्या दृष्टीस पडला नाही; नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करत चालला.


प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्यामागे कर्ण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan