Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 10:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 करूबांच्या पंखांचा ध्वनी बाहेरच्या अंगणात ऐकू जात होता; सर्वसमर्थ देवाच्या वाणीसारखा तो होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग बाहेरील अंगणात करुबाच्या पंखांचा आवाज मी ऐकला, तो सर्वसामर्थी परमेश्वर देवाच्या वाणीसारखा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 करुबांच्या पंखांचा आवाज बाहेरील अंगणात ऐकू येत होता, तो तर सर्वसमर्थ परमेश्वर बोलतात असा त्यांच्या वाणीसारखा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 10:5
19 Iomraidhean Croise  

ह्या सगळ्या इमारतीस पायापासून मुंढेरीपर्यंत आतून बाहेरून मोलवान ताशीव चिरे लावले होते. ते चिरे मापून करवतींनी चिरून तयार केले होते; बाहेरच्या मोठ्या अंगणात ते लावले होते.


आणखी त्याने याजकांचे अंगण व एक मोठे अंगण केले आणि अंगणाला दरवाजे करून त्यांची कवाडे पितळेने मढवली.


देवाच्या भुजासारखा तुझा भुज आहे काय! त्याच्या वाणीप्रमाणे तुला गर्जना करता येते काय?


पुरातन आकाशांच्या आकाशावर आरूढ होऊन जो स्वारी करतो, त्याची स्तोत्रे गा; पाहा, तो आपला शब्द, सामर्थ्याचा शब्द, उच्चारतो.


मेघांनी वर्षाव केला; आभाळ कडाडले; तुझे बाणही सुटले.


तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग जमले व शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला, तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले.


शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला, तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने1 उत्तर देत गेला.


तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तेव्हा मी म्हणालो, “हा मी आहे! मला पाठव.”


ते चालत असता मला त्यांच्या पंखांचा आवाज ऐकू आला; तो महाजलाशयांच्या आवाजासारखा, सर्वसमर्थाच्या वाणीसारखा होता; लष्कराच्या गजबजीप्रमाणे तो मोठा होता; ते उभे राहत तेव्हा आपले पंख खाली सोडत.


त्याने शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेल्या मनुष्याला आज्ञा देऊन सांगितले की, “त्या चाकांमधून, करूबांच्या मधून, इंगळ घे;” तेव्हा तो जाऊन चाकाच्या बाजूला उभा राहिला.


तेव्हा त्याने मला बाहेरील अंगणात नेले तेव्हा तेथे सभोवार खोल्या असून त्या अंगणात चिरेबंदी केली होती असे दृष्टीस पडले; ह्या चिरेबंदीवर तीस खोल्या होत्या.


नंतर त्याने मला बाहेरच्या अंगणात नेले व त्याच्या चार्‍ही कोपर्‍यांतून मला फिरवले तेव्हा त्या अंगणाच्या प्रत्येक कोपर्‍यात आणखी एकेक अंगण दृष्टीस पडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan