Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मग परमेश्वर तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्याला म्हणाला, “करूबांखाली चाकांच्या मध्ये जाऊन करूबांच्या मधून इंगळांनी आपली ओंजळ भर व ते नगरावर विखर.” तेव्हा तो माझ्यादेखत गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मग परमेश्वर देव तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाशी बोलला आणि म्हणाला, “करुबाच्या खालील चाकाच्या मध्य भागात जा, व आपल्या दोन्ही हातात जळते करुबांच्या मधून कोलीत घे आणि ते शहरावर पसरवून टाक” मग तो पुरुष मी पाहत असताना गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तेव्हा तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाला याहवेहने म्हटले, “करुबाखालच्या चाकांमधून जा आणि करुबांच्या मधील जळत्या निखार्‍यांनी आपली ओंजळ भर आणि ते शहरात पसरून टाक.” मी पाहत असता, तो आत गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 10:2
19 Iomraidhean Croise  

त्याने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा जाळून टाकला, तशीच यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली.


त्यांच्यावर इंगळ पडोत; ते अग्नीत टाकले जावोत, ज्यांतून त्यांना उठून वर येता येणार नाही अशा खाचांत ते टाकण्यात येवोत.


तो करूबारूढ होऊन उडाला, त्याने वायूच्या पंखांनी वेगाने उड्डाण केले.


आणि सोन्याचे दोन करूब2 दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी कर; ते घडीव कामाचे असावेत.


तेव्हा परमेश्वर आपला प्रतापी शब्द कानी पाडील, आणि आपल्या क्रोधाचे फुरफुरणे, भस्म करणार्‍या अग्नीची ज्वाला, मेघांचा गडगडाट आणि पर्जन्य व गारा ह्यांची वृष्टी ह्यांनी आपले भुजबल दाखवील.


त्या प्राण्यांचे रूप म्हटले तर अग्नीच्या इंगळासारखे, मशालीसारखे दिसत होते. अग्नी त्या प्राण्यांमधून खेळत होता; तो धगधगीत असून त्यातून विद्युल्लता निघत होती.


करूब चालले म्हणजे चाके त्यांच्याबरोबर चालत आणि भूमीवरून उंच उडण्यासाठी ते आपले पंख उचलत तेव्हा ती चाके वेगळी होत नसत.


तेव्हा पाहा, कंबरेनजीक कारकुनाची दऊत असलेल्या व शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्याने परत येऊन कळवले की, “तुझ्या आज्ञेप्रमाणे मी केले आहे.”


मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारुढ झाला; त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते; त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते; व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती.


तेव्हा देवदूताने ‘धुपाटणे’ घेऊन त्यात ‘वेदीवरचा अग्नी भरून’ पृथ्वीवर टाकला आणि ‘मेघांचा गडगडाट व गर्जना’ झाल्या, ‘विजा’ चमकल्या व भूमिकंप झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan