Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मी पाहिले तेव्हा करूबांवरल्या छतांवर नीलमण्यासारखे काही दिसले, ते सिंहासनाच्या प्रतिमेसारखे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग मी पाहिले की करुबीम दुताच्या चार पंख असलेल्या जीवांच्या डोक्याच्या माथ्यावर जे घुमटाच्या आकारासारखे काही होते त्याच्यावर नीलमण्याच्या राजासनाच्या आकृतीसारखे काही माझ्या दृष्टीस पडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मग मी पाहिले आणि करुबांच्या डोक्यावर असलेल्या घुमटावर नीलमण्यासारखे दिसणारे सिंहासन मला दिसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 10:1
27 Iomraidhean Croise  

परमेश्वर म्हणाला, “मी जे करणार आहे ते अब्राहामापासून लपवून ठेवू काय?


त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेर्‍याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले;


तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले; पण अब्राहाम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला.


मग तो म्हणाला, “पाहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करत आहे; तेथे कदाचित वीसच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या विसांकरता मी त्याचा नाश करणार नाही.”


देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणार्‍या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली.


याकोब एकटाच मागे राहिला, तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली.


मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनीएल (देवाचे मुख) असे ठेवले, तो म्हणाला, “कारण मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला.”


तो करूबारूढ होऊन उडाला, त्याने वायूच्या पंखांनी वेगाने उड्डाण केले.


त्यांनी इस्राएलाच्या देवाला पाहिले; त्याच्या पायांखाली नीलकांत मण्यांच्या चबुतर्‍यासारखे काही होते आणि ते अगदी आकाशासारखे स्वच्छ होते.


बरेच दिवस लोटल्यावर परमेश्वर मला म्हणाला, “ऊठ, फरात नदीकडे जा व जो कमरबंद तेथे लपवून ठेवण्यास तुला मी सांगितले होते तो घेऊन ये.”


तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले :


मी खबार नदीच्या तीरी पकडून आणलेल्या लोकांत राहत होतो, तेव्हा तिसाव्या वर्षाच्या चौथ्या मासी पंचमीस असे झाले की आकाश दुभागून मला दिव्य दृष्टान्त दिसले.


खबार नदीच्या तीरी मी इस्राएलाच्या देवाच्या आसनाखाली पाहिला होता तो हा प्राणी होय; ते करूब आहेत हे मला कळले.


तेव्हा करूबांनी आपले पंख उचलले, त्यांच्याबरोबर चाकेही उचलली गेली आणि इस्राएलाच्या देवाचे तेज त्यांच्यावर होते.


तेव्हा पाहा, कंबरेनजीक कारकुनाची दऊत असलेल्या व शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्याने परत येऊन कळवले की, “तुझ्या आज्ञेप्रमाणे मी केले आहे.”


मी आपल्या पहार्‍यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन; तो माझ्याबरोबर काय बोलेल आणि माझ्या गार्‍हाण्याविषयी त्याला मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन.


देवाला कोणीही कधीच पाहिले नाही; जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.


त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यांतून उठवले;


परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत.


तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता ‘देवाच्या उजवीकडे’ आहे, त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत.


आणि त्या समयांच्या मध्यभागी ‘मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ वस्त्र परिधान केलेला,’ आणि छातीवरून ‘सोन्याचा’ ‘पट्टा बांधलेला’ असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला;


Lean sinn:

Sanasan


Sanasan